पालकमंत्र्यांचा दौरा ठरला अपयशी व कुचकामी; भिवंडीतील सर्वच महामार्गांवर वाहतूक कोंडी, प्रवासी हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 02:47 PM2021-09-27T14:47:53+5:302021-09-27T15:26:03+5:30
भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गाबरोबरच भिवंडी ठाणे महामार्ग, त्याच बरोबर मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गावरदेखील मोठी वाटून कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे भिवंडी शहरातील अंतर्गत रस्त्यांवरदेखील मोठी वाहतूक कोंडी झाल्याने सकाळपासून वाहन चालकांसह प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
भिवंडी- सध्या भिवंडीतील सर्वच महामार्गांची प्रचंड दुरवस्था झाल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागासह टोल कंपन्यांना हे खड्डे भरण्यास अपयश आल्याने भिवंडीतील सर्वच रस्त्यांवर सध्या प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. सोमवारी सकाळपासून भिवंडीतील रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गाबरोबरच भिवंडी ठाणे महामार्ग, त्याच बरोबर मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गावरदेखील मोठी वाटून कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे भिवंडी शहरातील अंतर्गत रस्त्यांवरदेखील मोठी वाहतूक कोंडी झाल्याने सकाळपासून वाहन चालकांसह प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. विशेष म्हणणे दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी भिवंडीत होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी स्वतः ठाणे भिवंडी, असा दौरा करून वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होण्यासाठी संबंधित प्रशासनास सूचना दिल्या होत्या.
मात्र सोमवारी सकाळपासून भिवंडीतील महामार्गांबरोबरच अंतर्गत रस्त्यांवर रोजच्या पेक्षा अधिक वाहतूक कोंडी पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर भिवंडीत झाल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा पुरता अपयशी व कुचकामी ठरल्याची प्रचिती आज भिवंडीतील रस्त्यांवर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे पाहायला मिळाली. मुंबई - नाशिक महामार्गावरील ठाणे भिवंडी बायपास रस्त्यावर तर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती . नाशिक कडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर तब्बल चार किलोमीटरहुन जास्त वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे य मार्गाची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बनविलेल्या रांजणोली नाका येथील उड्डाणंपुलावरदेखील मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
पालकमंत्र्यांचा दौरा ठरला अपयशी व कुचकामी; भिवंडीतील सर्वच महामार्गांवर वाहतूक कोंडी, प्रवासी हैराण#Eknathshinde#Traffictjame
— Lokmat (@MiLOKMAT) September 27, 2021
https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/UNF2EfZVMZ
ठाणे भिवंडी हा महामार्ग तर वाहतूक कोंडीसाठी आधीपासूनच प्रसिद्ध आहे. मात्र आज या महामार्गावर रोज पेक्षा अधिक वाहतूक कोंडी झाली होती. ज्याचा परिणाम अंजुरफाटा चौकातील अंतर्गत रस्त्यांवरदेखील झाला होता. अंतर्गत रस्त्यांवरदेखील मोठी वाहतूक कोंडी झाल्याने तब्बल अर्धा ते पाऊण तास वाहने जगाच्या जागीच उभी होती. तर वंजारपट्टी नाका ते वडपा रस्त्यावर तसेच वंजारपट्टी नाका ते मीठपाडा या अंतर्गत रस्त्यावरदेखील मोठी वाहतूक कोंडी झाली होती.