क्वारंटाइन सेंटरमधील गैरसोयींबद्दल पालकमंत्र्यांनी दिली ताकीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 01:49 AM2020-05-30T01:49:44+5:302020-05-30T01:49:58+5:30
कोविड रुग्णालये व क्वारंटाइन सेंटर येथील रुग्ण व संशयितांना उत्तम आहार मिळणे, तेथील बेड, गाद्या, उशा, चादरी यांची व्यवस्था, औषधे व स्वच्छता साहित्याची उपलब्धता, रुग्णवाहिकांची उपलब्धता यावर ते सातत्याने लक्ष ठेवून आहेत
ठाणे : करोनाविरोधातील मुकाबल्यात आपण सर्वच एकदिलाने काम करत आहोत. करोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या संशयित व्यक्तींच्या विलगीकरणासाठी क्वारंटाइन सेंटरही मोठ्या प्रमाणात सुरू केली आहेत. मात्र, या ठिकाणी दाखल केलेल्यांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची काळजी ठाणे महापालिकेने घ्यायची आहे. याबाबतच्या तक्रारी खपवून घेणार नाही, अशी सक्त ताकीद ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिली.
कोविड रुग्णालये व क्वारंटाइन सेंटर येथील रुग्ण व संशयितांना उत्तम आहार मिळणे, तेथील बेड, गाद्या, उशा, चादरी यांची व्यवस्था, औषधे व स्वच्छता साहित्याची उपलब्धता, रुग्णवाहिकांची उपलब्धता यावर ते सातत्याने लक्ष ठेवून आहेत. याच अंतर्गत त्यांनी शुक्रवारी ठाणे महापालिका अधिकाऱ्यांसमवेत घोडबंदर रोड येथील होरायझन स्कूलमधील क्वारंटाइन केंद्राला भेट दिली. त्यानंतर ध्वनिक्षेपकाद्वारे त्यांनी तेथे विलगीकरण केलेल्यांशी संवाद साधून उपरोक्त ताकीद दिली. त्यानंतर शिंदे यांनी शहरातील तीनहातनाका येथील गुरुद्वारा येथे शीख बांधवांच्या वतीने चालवण्यात येणाºया कम्युनिटी किचनचीही पाहणी करून शिख बांधवांचे विशेष आभार मानले.
च्ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी त्यांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासमवेत महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त विजय सिंघल आदी उपस्थित होते. च्या रुग्णवाहिकांमध्ये महापालिकेच्या ३ कार्डियाक, २ खासगी कार्डियाक रुग्णवाहिका आहेत. च्तसेच १४ टीएमटी बस १५ स्कूल बससह रुग्णवाहिकेमध्ये रुपांतरित केलेली २० इतर वाहने आणि ११ खासगी रुग्णवाहिकांचा समावेश आहे. ही संख्या १०० पर्यंत वाढविण्याच्या सूचना यावेळी शिंदे यांनी केल्या.