बोगस कागदपत्राद्वारे फसवणूक करणाऱ्या गुजरातच्या आरोपीला मुंबईत अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 10:19 PM2022-01-01T22:19:32+5:302022-01-01T22:20:47+5:30

मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दादाहरी चौरे, पोलिस निरीक्षक(गुन्हे) गिताराम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात येत होता.

Gujarat accused arrested in Mumbai for cheating to fake document | बोगस कागदपत्राद्वारे फसवणूक करणाऱ्या गुजरातच्या आरोपीला मुंबईत अटक

बोगस कागदपत्राद्वारे फसवणूक करणाऱ्या गुजरातच्या आरोपीला मुंबईत अटक

googlenewsNext
ठळक मुद्देमहिला सहाय्यक पोलिस निरीक्षक कृपाली बोरसे आणि त्यांच्या पथकातील पोलिस नायक दिलीप किरपण, प्रविण कुंभार, पोलिस शिपाई पंकज गायकर, काँन्स्टेबल भुषण खैरनार, प्रमोद जमदाडे यांनी अटक केली.

मुंब्रा - बोगस कागदपत्राच्या आधारे लाभार्थी नसलेल्यांना एमएमआरडीएची घरे मिळवून देऊन, सरकारची आणि नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. इमराण जुनेजा उर्फ मुन्ना मर्चट (वय ३९, सध्या रा.आजाद नगर ए चाळ,रुम नंबर ३, खडी मशीन रोड,मुंब्रा) या मूळच्या गुजरातमधील अहमदाबाद येथे राहणाऱ्याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे.  

मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दादाहरी चौरे, पोलिस निरीक्षक(गुन्हे) गिताराम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात येत होता. महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक कृपाली बोरसे आणि त्यांच्या पथकातील पोलिस नायक दिलीप किरपण, प्रविण कुंभार, पोलिस शिपाई पंकज गायकर, काँन्स्टेबल भुषण खैरनार, प्रमोद जमदाडे यांनी अटक केली. त्याच्याकडे आढळलेले प्राधिकरण सदनिका वाटपाचे आदेश लिहिलेले ९९ बुकलेट, रुम दिल्याचे लँमिनेशन केलेले दाखले (सर्टिफिकेट),२१ शिक्के,२४ चाव्या, एमएमआरडीएचे २४ स्टिकर,१८ ग्राहकांच्या सदनिकांची कागदपत्रे, ५ स्टँम्प पँड, डायरी, प्रिटर, तुळजाभवानी को.आँप.सोसायटीचे नऊ लेटरहेड, टोरंटचे पिंक कलरचे १८ फाँर्म असा ऐकून १० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. न्यायालयाने त्याला ७ जानेवारी २०२२ पर्यत पोलीस कोठडी सुनावली. आतापर्यंत त्याने बोगस कागदपत्राच्या आधारे किती जणांना कुठे-कुठे रुम मिळवून दिल्या. याचा तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
 

Web Title: Gujarat accused arrested in Mumbai for cheating to fake document

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.