रस्ते सफाईसाठी गुजरातचे वाहन, सोशल मीडियावर पालिकेवर टिका

By अजित मांडके | Published: August 8, 2023 09:16 PM2023-08-08T21:16:33+5:302023-08-08T21:16:40+5:30

सोशल मीडियावर सुद्धा हे वाहन व्हायरल झाले असून पालिकेवर टीका सुरू झाली आहे. 

Gujarat vehicle for road cleaning, criticizes municipality on social media | रस्ते सफाईसाठी गुजरातचे वाहन, सोशल मीडियावर पालिकेवर टिका

रस्ते सफाईसाठी गुजरातचे वाहन, सोशल मीडियावर पालिकेवर टिका

googlenewsNext

ठाणे : रस्ते सफसफाईसाठी महापालिकेने घेतलेली सफाई यंत्र गाड्या आता वेगळ्याच मुद्याने चर्चेत आल्या आहेत. दोन वाहनांपैकी एका वाहनांची नोंदणी गुजरात राज्यातील असल्याची बाब पुढे आली आहे. शहरातील रस्ते सफाईसाठी थेट गुजरातवरून यंत्र वाहन आणण्यात आल्याने शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर सुद्धा हे वाहन व्हायरल झाले असून पालिकेवर टीका सुरू झाली आहे. 

ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठेकेदारांना रस्ते सफाईच्या कामाचा दर्जा सुधारण्यासाठी यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाई करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ठाण्यातील मोठ्या रस्त्यांची सफाई करण्यासाठी एकूण सहा सफाई यंत्र वाहने घेण्यात येणार असून त्यापैकी दोन वाहने पालिकेच्या ताफ्यात दोन महिन्यांपुर्वी दाखल झाली आहेत. भाडे तत्वावर ही वाहने पालिकेने घेतली आहेत. रस्त्यावरील कचरा, रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर साठणारी धूळ काढण्याचे काम ही वाहने करतात. 

ठाणे शहरातील मुख्य रस्ते तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील रस्त्यांची सफाई या यंत्र वाहनाद्वारे करण्यात येत आहे. दोनपैकी एक वाहनाची नोंदणी महाराष्ट्र राज्यातील आहे तर, दुसऱ्या वाहनाची नोंदणी गुजरात राज्यातील आहे. शहरातील रस्ते सफाईसाठी थेट गुजरातवरून यंत्र वाहन आणण्यात आले असून हा शहरात चर्चेचा विषय बनला आहे.

सोशल मीडियावर या वाहनाचे छायाचित्र आणि त्यासोबत पालिकेच्या कारभारावर टिका करणारा मजकूर प्रसारित झाला आहे. त्यात ठाणे महापालिकेच्या गाड्या गुजरातवरून...थोड्या काळाने महाराष्ट्र गुजरातच चालवणार का, असा प्रश्न उपस्थित करत पालिकेच्या कारभारावर टिका करण्यात आली आहे. त्याचबरोबर मराठी माणसा जागा हो असे आवाहनही करण्यात आले आहे. या वाहनामुळे शहरात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

हि वाहने कंत्राटदाराची आहेत. पालिकेने ही वाहने खरेदी केलेली नाहीत. तुषार पवार,उपायुक्त, ठाणे महापालिका

Web Title: Gujarat vehicle for road cleaning, criticizes municipality on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.