मराठमोळ्या डोंबिवलीत गुजराथी तितुका मेळवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 01:11 AM2020-03-04T01:11:53+5:302020-03-04T01:11:57+5:30

डोंबिवलीतील एका सोसायटीच्या मित्र मंडळाने आयोजित केलेले अंडरआर्म ओपन क्रिकेटचे सामने राजकीय वर्तुळात वेगळ्याच कारणाने चर्चेला आले आहेत.

Gujrati tatuka should be mixed with Marathi beads in Dombivali | मराठमोळ्या डोंबिवलीत गुजराथी तितुका मेळवावा

मराठमोळ्या डोंबिवलीत गुजराथी तितुका मेळवावा

Next

डोंबिवली : डोंबिवलीतील एका सोसायटीच्या मित्र मंडळाने आयोजित केलेले अंडरआर्म ओपन क्रिकेटचे सामने राजकीय वर्तुळात वेगळ्याच कारणाने चर्चेला आले आहेत. या क्रिकेट स्पर्धेचा भाजपशी काही संबंध नसल्याचे सांगण्यात येत असले तरी, येथे नमो रामो ट्रॉफी विजेत्या संघाला दिली जाणार आहे. या कार्यक्रमास भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांना पाचारण करण्यात आले असून, विशेष म्हणजे विशिष्ट समाजाच्या खेळाडूंनाच येथे प्रवेश दिला जाणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मराठमोळ््या डोंबिवलीत ‘गुजराथी तितुका मेळवावा’चा प्रयत्न आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी सुरु झाल्याची चर्चा शिवसेनेत आहे.
युवा आशापूरा मित्र मंडळ अर्थात वायएएमएम ग्रुपतर्फे अंडरआर्म ओपन क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याची जाहिरात सोशल मिडीयावर झळकली आहे. या सामन्यांमध्ये सोसायटीतील केवळ गुजराथी, राजस्थानी आणि कच्छी समाजाचे क्रिकेटपटुच सहभागी होऊ शकतील, असे या जाहीरातीत म्हटले आहे. या सामन्यांमध्ये अन्य भाषिक खेळाडुंना मज्जाव करण्यात आला आहे. ही स्पर्धा एका सोसायटीपुरती मर्यादीत असल्याने अन्य भाषिकांना मज्जाव करण्यात आला आहे. त्यात अन्य भाषिकांचा द्वेष करण्याचा उद्देश मुळीच नाही. स्पर्धा कोठे आणि केव्हा होणार आहे, हे अद्याप निश्चित नसल्याचे या मित्र मंडळातील एका सदस्याने सांगितले. मित्र मंडळाचे खुलासा अशा प्रकारचा असला तरी, महापालिकेच्या आगामी निवडणुका पाहता भाजपच्या आमदाराला त्याठिकाणी पाचारण करण्याची जाहिरात आधीच करणे, तसेच ट्रॉफीचे नाव नमो रामो ठेवणे, हे सगळे भाजपकडे झुकणारे आहे.
महाविकास आघाडीच्या समीकरणानंतर कल्याण डोंबिवलीतही शिवसेना-भाजपची फारकत झाली, त्याचाच परिमाण म्हणून भाजपला आता गुजराथी, राजस्थानी, कच्छी वोट बँक आपलीशी वाटू लागली आहे. डोंबिवलीत या मतदारांची संख्या ८० हजाराच्या जवळपास आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या मतदारांनी यापूर्वीही भाजपला मतदान केले आहे. महापालिका निवडणुकीत मराठी मते ही शिवसेना व मनसेत विभागाली जाणार आहेत. हे विभाजन पाहता भाजपने गुजराथी तितुका मेळवावा या उद्देशाने या स्पर्धा आयोजित केल्याचे स्पष्ट होत आहे.
>याबाबत शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी म्हणाले की, अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. डोंबिवलीने शहराने गुजराथी, कच्छ आणि राजस्थानी समाजाला समावून घेतले आहे. त्यांनी अन्य समाजांना मज्जाव करु नये. सर्वांसाठी स्पर्धा खुली ठेवावी.
>मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी सांगितले की, सांघिक खेळातून एकसंघ होण्याची प्रेरणा मिळते. त्यास प्रांतवादाचा रंग देणे योग्य नाही. ही दुर्दैवी बाब आहे. यात आयोजकांनी सुधारणा करावी. आमदार रवींद्र चव्हाण यांनी आयोजक मित्रमंडळाचा भाजपशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले. आमदार या नात्याने मला कार्यक्रमास बोलावल्याचे ते म्हणाले.दरवर्षी हे मंडळ अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करते. तिथे आमदार या नात्याने मी उपस्थित राहतो. त्यात मतांचे राजकारण अथवा महापालिकेच्या निवडणुकीचा संबंध नाही. एक चांगला कार्यक्रम होऊ घातला असताना त्याला राजकीय रंग देणे योग्य नाही, असे चव्हाण म्हणाले.

Web Title: Gujrati tatuka should be mixed with Marathi beads in Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.