गुलाबराव पाटील यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 08:13 PM2018-01-29T20:13:01+5:302018-01-29T20:13:01+5:30
विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम, योजना राबवून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्व विकास करणाºया गुलाबराव पाटील यांना शिक्षणक्षेत्रातील योगदानाबद्दल कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कल्याण- विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम, योजना राबवून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्व विकास करणाºया गुलाबराव पाटील यांना शिक्षणक्षेत्रातील योगदानाबद्दल कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मुंबईतील परळ येथील दामोदर नाटयगृहात सेकंडरी स्कूल एम्पॉयीज के्रडीट सोसायटीने नुकताच गुणगौरव कार्यक्रमात आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन पाटील यांचा सन्मान करण्यात आला आहे.
पाटील हे कल्याण येथील सम्राट अशोक विद्यालयात मुख्याध्यापक असून शिक्षक परिषदेचे महानगर कार्यवाह तसेच मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष आहेत. विद्यार्थ्यांना क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या व्यतिरिक्त प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान मिळावे यासाठी ते सातत्याने उपक्रमांचे आयोजन करीत असतात. बाल महोत्सव, आजी आजोबा स्नेहसंमेलन, बैलपोळा, विद्यार्थी सुरक्षितता, समुपदेशन अशा उपक्रमांव्यतिरिक्त शासनाच्या बहुचर्चित प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत त्यांनी अनेक योजना शाळेमध्ये राबविल्या आहेत. शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
फोटो आहे.
------------------------------------------------------------
डोंबिवलीत राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन
डोंबिवली- इंडियन रोझ फेडरेशन या अखिल भारतीय गुलाबप्रेमी संस्थेतर्फे आणि डोंबिवलीकर मासिकाचे संपादक, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून ३ आणि ४ फेबु्रवारीला सकाळी १० ते रात्री १० या वेळेत आनंद बालभवन, रामनगर, डोंबिवली (पूर्व) येथे डोंबिवली रोझ फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. धकाधकीच्या जीवनाच त्रस्त झालेल्या डोंबिवलीकरांना या फेस्टीवलमधून छानछान गुलाब पाहायला मिळणार आहेत.
गुलाबांची नजाकत काही औरच असते. त्याचे मनमोहक रूप, आकर्षक रंग, ताजा टवटवीत डौलदारपणा आणि सर्वात महत्त्वाची त्याची अतुलनीय अशी रोमॅटीक व्हॅल्यू आबालवृध्दांच्या मनाला नक्कीच साद घालते. महाराष्ट्रातील मोठमोठ्या गुलाब शेती करणाºया व्यक्ती आणि संस्थांना या फेस्टीवलमध्ये आमंत्रित केले आहे. मुंबई, पुणे, वांगणी, पनवेल, शहापूर, नागपूर येथील गुलाब या फेस्टीवलमध्ये दिसणार आहेत. ठाणे जिल्हयातील डॉ. विकास म्हसकर आणि मोरे बंधू यांचा ही प्रदर्शनात सहभाग असणार आहे. गुलाब प्रदर्शनाव्यतिरिक्त फेस्टीवलमध्ये आकर्षक पुष्परचना सजावट आयोजित केली आहे. यामध्ये गुलाब फुलाला केंद्रस्थानी ठेवून अन्य फुले लावण्यात येणारआहे.
------------------------------------------------------------