उल्हासनगर महापालिका फुटबॉल स्पर्धेत गुरुनानक शाळेला विजयी
By सदानंद नाईक | Published: July 26, 2023 08:14 PM2023-07-26T20:14:34+5:302023-07-26T20:14:43+5:30
उल्हासनगर महापालिका क्रीडा विभागाने, बुधवारी संच्युरी रेयॉन कंपनीच्या रामलीला मैदानावर फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते.
उल्हासनगर : महापालिका क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या शालेय फुटबॉल स्पर्धेत गुरुनानक शाळा विजयी झाली. फुटबॉल स्पर्धेचे उदघाटन आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते होऊन उपविजेता संच्युरी रेयॉन शाळा ठरली आहे.
उल्हासनगर महापालिका क्रीडा विभागाने, बुधवारी संच्युरी रेयॉन कंपनीच्या रामलीला मैदानावर फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. महापालिका आयुक्त तथा प्रशासक अजीज शेख यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. वयोगट १४ वर्षा खालील मुले व १७ वर्षाखालील मुले-मुली करीता सुब्रतो फुटबॉल कप-२०२३ या क्रीडा स्पर्धेचे आयोजन महापालिका क्रीडा विभागाने केले.
सदर स्पर्धेत ६ शाळां मधिल एकुण १० टिम सहभागी झाल्या होत्या. सुन्नतो फुटबॉल स्पध्ये १४ वर्ष वयोगटात गुरूनानक शाळेच्या मुलांनी प्रथम क्रमांक पटकावला तर सॅच्युरो शाळेचा दुसरा क्रमांक पटकावला. १७ वर्ष वयोगटातील मुलां मध्ये न्यु इंग्लिश हायस्कुल यांचा प्रथम क्रमांक तर गुरुनानक हायस्कुल शाळा उपविजेता ठरला असून सेंच्युरी हायस्कुलच्या मुलांनी तिसरा क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. १७ वर्षे वयोगाटातील गुरूनानक हायस्कुलच्या मुलांनी प्रथम क्रमांकाने विजय मिळविला, उल्हास विद्यालयाच्या मुलीनी दुसरा क्रमांक प्राप्त केला तर तिस-या क्रमांकाचे पारितोषिक हे न्यू ईरा हायस्कुलच्या मुलीनो मिळविला आहे.
महापालिका क्रीडा विभागाने आयोजित केलेल्या फुटबॉल कार्यक्रमाला आयुक्त तथा प्रशासक अजिज शेख, उपायुक्त प्रियंका राजपुत, क्रीडा अधिकारी शांताराम चौधरी, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे आदीजन उपस्थित होते.