समाज शाळेचे गुरु म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे - वैदेही रानडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 07:17 PM2019-12-23T19:17:39+5:302019-12-23T19:21:45+5:30
येथील नियोजन समिती सभागृहात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षे सोहळा रानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रंसगी समाज कल्याण सहायक आयुक्त प्रविण शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या कुसूम गोखले, प्रा.राजू पाटोळे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक अरु णा जोशी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती
ठाणे : समाज ही एक शाळा आहे. या शाळेचे गुरु म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, त्याचे विचार आपण अनुकरणात आणले पाहिज,असे प्रतिप्रादन येथील अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी केले.
येथील नियोजन समिती सभागृहात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षे सोहळा रानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रंसगी समाज कल्याण सहायक आयुक्त प्रविण शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या कुसूम गोखले, प्रा.राजू पाटोळे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक अरु णा जोशी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. या वेळ व्यंकट शिंदे, बब्रुवान अर्जुने, राजू खंडझोड, गोपाल वाघमारे, रामदास उमाप, रंगनाथ साळवे यांना रानडे यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थांना ही यावेळी गौरविण्यात आले.
या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रानडे म्हणाल्या ‘पुरस्कार प्रत्येकाची जबाबदारी वाढवितो. पुरस्कार स्वीकारणे म्हणजे समाजाची जबाबदारी स्वीकारणे होय. विद्यार्थांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात उच्च पदावर जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी समाज व प्रशासन तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही ही रानडे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना दिली. यावेळी प्रा. राजू पाटोळे म्हणाले की,शिक्षणाची खरी व्याख्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊसाठे यांनी सांगितली आहे. माणसात माणूस निर्माण करण्याचे काम अण्णानी केले. जसे बोलतो तस रेखाटण्याची ताकद अण्णा भाऊ साठे यांच्याकडे होती. यावेळी कुसूम गोखले म्हणाल्या की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून , पोवाड्यातून, समाज घडवला व समाजाला योग्य दिशा दिली आहे.आपण सर्वजन त्यांचे ऋणी असल्याचे ही त्यांनी यावेळी नमुद केले.