ठाण्यातून मुंबईत गुटखा तस्करी करणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 01:02 AM2021-06-07T01:02:37+5:302021-06-07T01:05:38+5:30
ठाण्यातून मुंबईत गुटखा तस्करी करणाºया नसरे आलम रजी अहमद शेख (२३, रा. मीरा रोड, ठाणे) या टेम्पो चालकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट पाचच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडून सुमारे साडे सात लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्यातून मुंबईत गुटखा तस्करी करणाºया नसरे आलम रजी अहमद शेख (२३, रा. मीरा रोड, ठाणे) या टेम्पो चालकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट पाचच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडून सुमारे साडे सात लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्याच्या अन्य दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील नितीन नाका ते तीन हात नाका बाजूकडे जाणाºया सेवा रस्त्याच्या मार्गाने एक टेम्पो गुटख्याची बेकायदेशीरपणे वाहतूक करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली घोडके यांच्या पथकाने नसरे याचा टेम्पो नितीन नाका ते तीन हात नाका मार्गावरील सेवा रस्त्यावर ४ जून रोजी दुपारी १२.५० वाजण्याच्या सुमारास पकडला. यातील मुख्य कथित आरोपी गुटख्याचा मालक आयुब (रा. जागेश्वरी) तसेच राजेश शेट्टी (रा. सायन, मुंबई) यांनी आपसात संगनमत करुन महाराष्टÑ शासनाने एक वर्षासाठी विक्री, वितरण आणि साठा करण्यासाठी प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची मुंबईत नेण्यासाठी वाहतूक केली जात होती. त्याच्याकडून सुमारे साडे सात लाखांचा गुटखा तसेच टेम्पोही जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात जमादार विजयकुमार गोºहे यांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील अन्य दोघांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक जे. पी. गावीत हे अधिक तपास करीत आहेत.