५५ लाख ९० हजारांचा गुटखा जप्त, खंडणी विरोधी पथकाची कारवाई
By अजित मांडके | Published: March 30, 2024 06:24 PM2024-03-30T18:24:49+5:302024-03-30T18:25:17+5:30
ठाणे : कर्नाटक मार्गे भिवंडीतील गोडावूनमध्ये अवैध्यरित्या आणण्यात आलेला ५५ लाख ९० हजारांचा गुटखा ठाणे खंडणी विरोधी पथकाने पकडला आहे. ...
ठाणे : कर्नाटक मार्गे भिवंडीतील गोडावूनमध्ये अवैध्यरित्या आणण्यात आलेला ५५ लाख ९० हजारांचा गुटखा ठाणे खंडणी विरोधी पथकाने पकडला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आले असून यात एक कंटेनरही ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील यांनी दिली.
या प्रकरणी शरीफसाब अब्दुल गौस सावनुर (३२) धंदा ड्रायव्हर, रा. शिगाव कर्नाटक व असाकअहमद अन्वरसाब निजामी (३५) धंदा ड्रायव्हर रा. कर्नाटक यांना अटक करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध्य धंदे चालू राहणार नाहीत, तसेच पाहिजे आरोपी पकडण्याबाबत मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने खंणी विरोधी पथकातील पोलीस शिपाई अरंविद शेजवळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीदाराच्या आधारावर २९ मार्च रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास राजलक्ष्मी कंपाऊड, एम गोडावून लगत असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर दोनही आरोपी कर्नाटक मार्गे गुटखा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने सापळा रचून दोघांना अटक करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने प्रतिंबधीत केलेला गुटखा, पान मसाला, तंबाखु जर्दा असा ४० लाख ८० हजारांचा माल व कंटेनर असा मिळून ५५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, तो माल भिवंडीमार्गे इतर ठिकाणी पाठविला जाणार होता. अटक आरोपींना ४ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती सहायय्क पोलीस आयुक्त, विशेष कार्यदल, गुन्हे शाखा ठाणे शहरचे शेखर बागडे यांनी दिली.