ज्ञानदान ही एक कला - चंद्रा
By admin | Published: December 14, 2015 01:14 AM2015-12-14T01:14:08+5:302015-12-14T01:14:08+5:30
शिक्षक स्वत:च्या ज्ञानातूून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत असतात. शिक्षकांचे बोलणे तसेच हावभाव करणे हे क लेशी निगडित असते,
ठाणे : शिक्षक स्वत:च्या ज्ञानातूून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत असतात. शिक्षकांचे बोलणे तसेच हावभाव करणे हे क लेशी निगडित असते, असे वक्तव्य छत्तीसगडच्या बस्तार विद्यापीठाचे कुलगुरू एनडीआर चंद्रा यांनी ठाणे येथील एनकेटी महाविद्यालयाच्या सभागृहात केले.
नॅक अॅक्रिडेशन आणि एनकेटी महाविद्यालयाच्या पुढाकाराने राष्ट्रीय पातळीवरील चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापन या सूत्रांवर आधारित होता. त्यामुळे एनडीआर चंद्रा यांनीदेखील अध्यापनाची अध्ययन व मूल्यमापनाच्या पध्दतीविषयी माहिती दिली. प्रत्येक विद्यापीठाला नियंत्रण असणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)२७ पेपर्स सादर
एनकेटी महाविद्यालायत प्रथमच अशा प्रकारच्या सेमिनारचे आयोजन करण्याते आले होते. भारतातील विविध भागातून एकूण २७ पेपरांचे सादरीकरण झाले. जे पेपर सादर झाले आहेत, त्याचा सारांश काढून मुंबई विद्यापीठाला पाठवणार असल्याचे एनकेटी महाविद्यालयाच्या प्राचार्य पी.एम. कानखेले यांनी सांगितले.