ग्रीन अँड क्लिन एनर्जी स्पर्धेत ज्ञानसाधना महाविद्यालय अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:47 AM2021-02-17T04:47:32+5:302021-02-17T04:47:32+5:30
ठाणे : सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटने ‘भारत पेट्रोलियम संरक्षण संशोधन संघटनेच्या (पीसीआरए)’ सहकार्याने ‘ग्रीन अँड क्लिन ...
ठाणे : सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटने ‘भारत पेट्रोलियम संरक्षण संशोधन संघटनेच्या (पीसीआरए)’ सहकार्याने ‘ग्रीन अँड क्लिन एनर्जी’ थीम आंतरमहाविद्यालयीन वॉल पेंटिंग स्पर्धा आयोजित केली. ठाणे शहरातील विविध महाविद्यालयांतील पाच संघ होते. या स्पर्धेत सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांकाचा मान मिळविला. या संघात शिवानी पाल, शिवानी मिश्रा, आयुष सरतापे, श्रेया कोलवणकर, नेहा सोनी या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
स्पर्धेचा प्रारंभिक बक्षीस समारंभ महाविद्यालयाच्या आवारात ज्ञानसाधना, ठाणे (सोसा.) चे सचिव कमलेश प्रधान, कोषाध्यक्ष सतीश शेठ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत चित्ते, उपप्राचार्या प्रा. प्रज्ञा कानविंदे आणि पीसीआरएची टीम यांच्या उपस्थितीत पार पडला. सोमवारी पीसीआरएच्यावतीने यशवंतराव चव्हाण सभागृहात वर्ष २०२१ साठी ‘हरित व स्वच्छ ऊर्जा’ या थिम अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल रेशनिंग कंट्रोलर व नागरी पुरवठा संचालक कमलेश पगारे यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले एनएनएस प्रमुख प्रा. सुरेश हलबांडगे आणि सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
सदर उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रा. शंकर झंजे, प्रा. विजयश्री भोर, प्रा. प्रीती निकते, डॉ. वंदना शिंदे, प्रा. निषाद पवार, प्रा. महेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.
---------
फोटो मेलवर