नाल्यात जीम प्रशिक्षकाचा मृत्यू: महापालिकेच्या ठेकेदाराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 08:47 PM2021-06-16T20:47:28+5:302021-06-16T20:50:07+5:30

कॅडबरी जंक्शन ते नितीन कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाल्याचे बांधकाम सुरु असलेल्या १२ फूट खोल नाल्यात कोसळून प्रसाद देऊलकर (३५, रा. दिवा, ठाणे) या मोटारसायकलवरील जीम प्रशिक्षकाचा (इन्स्ट्रक्टर) मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

Gym instructor killed in Nala: Municipal contractor arrested | नाल्यात जीम प्रशिक्षकाचा मृत्यू: महापालिकेच्या ठेकेदाराला अटक

वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

Next
ठळक मुद्दे वागळे इस्टेट पोलिसांची कारवाईन्यायालयीन कोठडीत रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कॅडबरी जंक्शन ते नितीन कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाल्याचे बांधकाम सुरु असलेल्या १२ फूट खोल नाल्यात कोसळून प्रसाद देऊलकर (३५, रा. दिवा, ठाणे) या मोटारसायकलवरील जीम प्रशिक्षकाचा (इन्स्ट्रक्टर) मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अभिजित बुराळकर (३६, रा. कांदिवली, मुंबई) या बांधकाम ठेकेदाराला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे.
ठाण्यातील सावरकरनगर येथील मित्राकडे काही कामानिमित्त आलेला प्रसाद मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुंबई ठाणे पूर्व द्रूतगती राष्टÑीय मार्गालगत असलेल्या कॅडबरी जंक्शन ते नितीन कंपनीच्या दिशेने जाणाºया सेवा रस्त्यावरुन जात होता. याच मार्गावर क्रिटिकेअर रुग्णालयाजवळ अभिजित या अभियंत्याच्या देखरेखीखाली नाल्याचे बांधकाम सुरु आहे. याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पुरेसे बॅरिकेटस लावलेले नव्हते. शिवाय, याठिकाणी सुरक्षारक्षकही नव्हता. त्यामुळे या रस्त्याच्या खोदकामाचा अंदाज न आल्यामुळे १२ फूट खोल नाल्यात कोसळून मोटारसायकलवरील प्रसाद देऊलकर या जीम प्रशिक्षकाचा मृत्यू झाला. या घटनेला कारणीभूत असलेला ठेकेदार अभिजित याच्याविरुद्ध कलम ३०४- अ नुसार हलगर्जीपणा तसेच मृत्युस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या पथकाने त्याला मंगळवारी अटक केली आहे. त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
आता रस्ता केला बंद
नाल्याच्या बांधकामाच्या ठिकाणी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे एका तरुणाचा नाहक बळी गेला. आता या घटनेतून बोध घेतलेल्या ठामपाने या नाल्याच्या ठिकाणी आता एका सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केली आहे. शिवाय, क्रिटिकेअर रुग्णालय ते नितीन कंपनी नाक्याकडे जाणारा हा रस्ता तात्पूरता बंद केला आहे. हीच कार्यवाही आधी केली असती तर प्रसाद देऊळकर या तरुणाचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रीया स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
 

Web Title: Gym instructor killed in Nala: Municipal contractor arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.