व्यापाऱ्यांच झालं, जिम चालकांच पुनश्च: हरी ओम कधी होणार?; शिष्टमंडळ मनसे आमदाराला भेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 05:56 PM2020-08-20T17:56:56+5:302020-08-20T17:57:18+5:30
कल्याण - डोंबिवली मध्ये सर्वाधिक जिम मालक हे मराठी आहेत. कोरोनाच्या संकटकाळात शासनाच्या नियमांचे पालन करत त्यांनी जवळपास आता 5 महिने जिम बंद ठेवल्या होत्या. मात्र आता कल्याण डोंबिवली मधील व्यापाऱ्यांची दुकान तसेच मार्केट सूरु झाली आहेत.
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेने बाजारपेठेतील दुकाने,मार्केट सुरू करण्यास नियम व अटीं आखून व्यापाऱ्यांना परवानगी दिली. त्याच धर्तीवर जिम सुरू करण्यास देखील परवानगी द्यावी यासाठी डोंबिवली जिम ऑनर्स असोसिएशनने केली आहे.जिम ऑनर्स असोसिएशनने सदस्यांनी आज मनसे आमदार राजू पाटील यांची भेट घेतली.
कल्याण - डोंबिवली मध्ये सर्वाधिक जिम मालक हे मराठी आहेत. कोरोनाच्या संकटकाळात शासनाच्या नियमांचे पालन करत त्यांनी जवळपास आता 5 महिने जिम बंद ठेवल्या होत्या. मात्र आता कल्याण डोंबिवली मधील व्यापाऱ्यांची दुकान तसेच मार्केट सूरु झाली आहेत.त्यामुळे आता कल्याण डोंबिवली मधील जिम देखील सुरू करा अश्या मागणीचे पत्र घेऊन पदाधिकाऱ्यांनी आमदारांची भेट घेतली आहे.
कोरोनाच्या संकटकाळात सर्वच व्यवसायिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे.त्यामध्ये जिम मालकांचा देखील समावेश आहे.त्यामुळे व्यापाऱ्यांना दिलेल्या दुकान सुरू करण्याच्या परवानगीच्या धर्तीवर जिम मालकांना देखील जिम सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या कडे केली आहे.शासन आणि महापालिका आखून देणाऱ्या नियम व अटींचे पालन करून आम्ही जिम सुरू करण्यास तयार असल्याचे जिम मालकांनी सांगितले आहे. कोरोनाच्या कालखंडात जिम मालकांचे देखील मासिक भाडे, वीजबिल थकलं आहे. त्याचप्रमाणे जिम मध्ये काम कामगार वर्ग सुद्धा मोठ्याप्रमाणात आहेत.त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेने जिम मालकांना देखील काही प्रमाणात सूट द्यावी अशी मागणी जिम मालकांनी केली आहे.
कल्याण डोंबिवली मध्ये ९०% जिम चालक हे मराठी आहेत.त्यामुळे त्यांच्यावर सध्या मोठा आर्थिक संकट आले आहे.त्यामुळे शासनाने व्यापाऱ्यांचे पुनश्च : हरी ओम केलं मात्र आता जिम चालकांच कधी करणार ? असा प्रश्न सध्या चालकांसमोर आहे.येत्या काही दिवसात जिम मालक आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता जिम चालकांच्या मागणीला केडीएमसी आयुक्त सकारात्मक प्रतिसाद देत मराठी उद्योजकांना न्यान देणार का हे पाहावे लागेल.