प्रश्न विचारण्याची सवय आणि संशोधक वृत्ती वाढली पाहिजे – डॉ. संग्राम पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 03:42 PM2020-09-29T15:42:54+5:302020-09-29T15:43:32+5:30

आपल्या देशात प्रश्न विचारायची सवय आणि संशोधक वृत्ती वाढवली पाहिजे, असे मत मूळचे महाराष्ट्रीयन आणि सध्या इंग्लंड येथील वैद्यकीय सेवेत कार्यरत असणारे डॉ. संग्राम पाटील यांनी व्यक्त केले.

The habit of asking questions and research attitude should be increased - Dr. Sangram Patil | प्रश्न विचारण्याची सवय आणि संशोधक वृत्ती वाढली पाहिजे – डॉ. संग्राम पाटील 

प्रश्न विचारण्याची सवय आणि संशोधक वृत्ती वाढली पाहिजे – डॉ. संग्राम पाटील 

googlenewsNext

कल्याण : कोरोना काळात ज्योतिष, गुरु, बाबा, मांत्रिक, अध्यात्मिक लोक, देवधर्माच्या संबंधित सर्वांनीच मैदानातून पळ काढला आहे. मानवी जीवन मौल्यवान असून प्रत्येकाने विवेकशीलता जपली पाहिजे. आपल्या देशात प्रश्न विचारायची सवय आणि संशोधक वृत्ती वाढवली पाहिजे, असे मत मूळचे महाराष्ट्रीयन आणि सध्या इंग्लंड येथील वैद्यकीय सेवेत कार्यरत असणारे डॉ. संग्राम पाटील यांनी व्यक्त केले. नुकताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने आयोजित ऑनलाइन व्याख्यानात "कोरोना कडून आपण काय शिकावे ?" या विषयावर ते बोलत होते.

डॉ. संग्राम पाटील म्हणाले, राजकीय सजगतेचा अभाव आपल्या देशात दिसतो. देशात या आजाराची गंभीर परिस्थिती असताना धार्मिक कार्यक्रम घडवले जातात. कष्टर्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्यापेक्षा एका अभिनेत्याची आत्महत्या हा मुद्दा जास्त महत्वाचा  ठरतो. धर्म, प्रांत यांच्या अस्मितेपेक्षा माणुसकी महत्वाची ठरली पाहिजे. जगभरात सध्या एकाच प्रश्नाला भिडले जाते, ते म्हणजे कोरोनावर मात करणे.

लोकांचे प्रश्न, लोकांचे प्राण वाचवणे, लस शोधण्याच्या प्रक्रियेला गती देणे. आपल्याकडे संशोधन वृत्तीला महत्त्व दिले जात नाही. शासकीय यंत्रणा माध्यमे यांच्या गैर व्यवस्थापनाने कोरोनाची भीती वाढली. योग्य काळजी घेतल्यास या आजारातून आपण नक्कीच बरे होऊ शकतो. आधुनिक जग हे पुराव्यावर विश्वास ठेवते. आपल्या देशात वैज्ञानिक दृष्टीकोन याला डावलून  फसवे विज्ञानाची चलती ही चिंताजनक आहे. निसर्गाने मानवाला खूप चांगल्या गोष्टी दिल्या आहेत, त्याचा सुयोग्य वापर करावा. कोरोना आजाराकडे संधी म्हणून बघू या, नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती याला प्राधान्य दिल्यास कोरोनाशी यशस्वी मुकाबला करणे शक्य आहे.  

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील होते. ते म्हणाले की, अं नि स च्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी या कोरोना काळात खूप मोलाचे कार्य केले आहे. मुख्यमंत्री निधीला मदत, रक्तदान, अन्न दान करण्याचे, मानस मैत्र माध्यमातून मानसिक आधार देण्याचे काम केले आहे. या दरम्यान विविध अंधश्रद्धा पुढे आल्या. त्यालाही विरोध केला, लोकांमध्ये प्रबोधन केले जात आहे. 

Web Title: The habit of asking questions and research attitude should be increased - Dr. Sangram Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.