ई-मेल हॅक करून कंपनीची ३२ लाखांची फसवणूक
By admin | Published: July 16, 2017 01:00 AM2017-07-16T01:00:39+5:302017-07-16T01:00:39+5:30
ई-मेल हॅक करून ठाण्यातील टेक्सन प्रा. लि. कंपनीला ३२ लाख ३५ हजार ५६५ रुपयांचा चुना लावल्याची घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ई-मेल हॅक करून ठाण्यातील टेक्सन प्रा. लि. कंपनीला ३२ लाख ३५ हजार ५६५ रुपयांचा चुना लावल्याची घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोलशेत येथे राहणारे विशेदास टोलवानी (७५) यांनी दिलेल्या तक्रारीत त्यांच्या कंपनीचा ई-मेल आयडी हॅक करून, त्याद्वारे कंपनीचा डाटा चोरण्यात आला. त्यानुसार, एसीएम कंपनीच्या नावाने ई-मेल पाठविताना कंपनीचे लेटरपॅड असल्याचे भासवून, कच्च्या मालाचे एकूण ३२ लाख ३५ हजार ५६५ रुपयांचे बिल पाठविले, तसेच कंपनीच्या नावे बोगस उघडलेल्या बँक खात्यात हे पैसे वळवून कं पनीची फसवणूक केल्याचे म्हटले आहे, तसेच हा प्रकार ४ नोव्हेंबर २०१५ ते ४ मार्च २०१६ दरम्यान घडला. व्यवहार आॅनलाइनद्वारे झाला असून, या प्रकरणी फसवणूक आणि आयटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल केल्याची माहिती, कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बन्सी बरावकर यांनी दिली.