भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; २५ ते ३० जणांचा घेतला चावा, लहान मुलांचाही समावेश

By नितीन पंडित | Published: July 9, 2024 12:12 AM2024-07-09T00:12:02+5:302024-07-09T00:12:16+5:30

भिवंडी पालिका क्षेत्रातील कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मागील कित्येक वर्षांपासून बंद

Haidos of a crushed dog in Bhiwandi; 25 to 30 people are bitten, including children  | भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; २५ ते ३० जणांचा घेतला चावा, लहान मुलांचाही समावेश

भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; २५ ते ३० जणांचा घेतला चावा, लहान मुलांचाही समावेश

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरातील शांतीनगर परिसरातील गौसिया मस्जिद परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला असून सोमवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या मुलांवर त्यांनी हल्ला चढवत तब्बल २५ ते ३० जणांना चावा घेतला आहे. त्यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसह लहान मुलांचा अधिक समावेश आहे.

या पिसाळलेल्या कुत्र्याने मागील तीन दिवसात या परिसरात अनेक नागरिकांना चावा घेतल्यानंतर आज या कुत्र्याने हैदोस घालत हा हल्ला चढवला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली व सर्वच चावा घेतलेला मुलांना स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारा करता दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोघा जणांची प्रकृती गंभीर झाली आहे. सर्वांवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत.स्थानिक नागरिकांनी या पिसाळलेल्या कुत्र्याला दगडाने ठेचून ठार मारले आहे. भिवंडी पालिका क्षेत्रातील कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मागील कित्येक वर्षांपासून बंद असून त्यामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

Web Title: Haidos of a crushed dog in Bhiwandi; 25 to 30 people are bitten, including children 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.