पालिकेचा हातोडा, सहा डान्सबार जमीनदोस्त
By admin | Published: February 8, 2016 02:33 AM2016-02-08T02:33:23+5:302016-02-08T02:33:23+5:30
शहरातील डान्सबार व आॅर्केस्ट्रा मालकांनी केलेल्या वाढीव बांधकामावर पालिका अतिक्रमण पथकाने शनिवारी सायंकाळी ७ ते ९ च्या दरम्यान कारवाई केली.
सदानंद नाईक, उल्हासनगर
शहरातील डान्सबार व आॅर्केस्ट्रा मालकांनी केलेल्या वाढीव बांधकामावर पालिका अतिक्रमण पथकाने शनिवारी सायंकाळी ७ ते ९ च्या दरम्यान कारवाई केली. याबाबतचे पत्र पोलीस उपायुक्त वसंत जाधव यांनी पालिकेला दिल्यावर काही तासात धडक कारवाई केल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली आहे.
उल्हासनगरातील डान्स व आॅर्केस्ट्रामध्ये बारबालांनी धिंगाणा घातल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी सी-हॉक बारवर एका आठवडयात दोनवेळा धाडी टाकून अश्लिल नृत्य करणाऱ्या बारबालासह ग्राहक, व्यवस्थापक व वेटर यांना अटक केली आहे. यावेळी बार मालकांनी बारबालांना गुप्त खोलीत लपवून ठेवल्याचे उघड झाले. पालिकेची परवानगी न घेता हे बांधकाम केले आहे. याबाबतचे पत्र पोलिस उपायुक्त वसंत जाधव यांनी पालिका आयुक्तांना शनिवारी दुपारी पाठविले होते.
आयुक्त मनोहर हिरे यांनी बेवॉच, सीहॉक, चांदणी, १०० डेज, अॅपल व राखी या सहा डान्स बार व आॅकेस्ट्राच्या वाढीव बांधकामावर कारवाईचे आदेश उपायुक्त नितिन कापडणीस व त्यांच्या पथकाला दिले. उपायुक्त कापडणीस यांनी सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, भगवान कुमावत, नंदलाल समतानी, मुख्य स्वच्छता निरिक्षक विनोद केणी यांच्यासह १५० कर्मचाऱ्यांच्या पथकाच्या मदतीने सायकांळी ७ ते ९ वाजण्याच्या दरम्यान सहाही बारचे वाढीव बांधकाम जमिनदोस्त केले