शाळेच्या जुन्या, पडक्या वास्तूंवर हातोडा पडणार

By admin | Published: August 19, 2015 11:50 PM2015-08-19T23:50:47+5:302015-08-19T23:50:47+5:30

लोकमतमध्ये सुरु असलेल्या शाळा सुटली पाटी फुटली या मालिकेमुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेला व तिच्या शिक्षणमंडळाला जाग आली असून तिच्या

The hammer will fall on the old, broken buildings of the school | शाळेच्या जुन्या, पडक्या वास्तूंवर हातोडा पडणार

शाळेच्या जुन्या, पडक्या वास्तूंवर हातोडा पडणार

Next

प्रशांत माने, कल्याण
लोकमतमध्ये सुरु असलेल्या शाळा सुटली पाटी फुटली या मालिकेमुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेला व तिच्या शिक्षणमंडळाला जाग आली असून तिच्या जुनाट व मोडकळीस आलेल्या वास्तू पाडण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अशा ठिकाणी सुरू असलेल्या अनैतिक धंद्यांनाही एकप्रकारे चाप बसणार आहे.
मोठा गाव ठाकुर्ली, कचोरे, उंबर्डे, बारावे यांसह डोंबिवली पूर्वेकडील हिंदी माध्यमाच्या शाळांची पुनर्बांधणी झाल्याने येथील जुन्या वास्तू आता तोडण्यात येणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला होता. परंतु, प्रशासनाकडून चालढकल सुरू होती. या मालिकेमुळे प्रशासनाची कुंभकर्णी निद्रा भंग पावल्याबद्दल समाधान व्यक्त होत असून आता या निर्णयाच्या अंमलबजावणीकडे लक्ष लागले आहे.

Web Title: The hammer will fall on the old, broken buildings of the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.