हणमंत जगदाळे यांचा गटनेतेपदाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:20 AM2019-08-30T00:20:45+5:302019-08-30T00:21:53+5:30

राष्ट्रवादीच्या कारभारावर सडकून टीका : श्रेष्ठींवरही व्यक्त केली नाराजी

Hanamant Jagdale resigns as party leader of NCP | हणमंत जगदाळे यांचा गटनेतेपदाचा राजीनामा

हणमंत जगदाळे यांचा गटनेतेपदाचा राजीनामा

Next

ठाणे : लोकशाही आघाडीचे गटनेते हणमंत जगदाळे यांनी गुरुवारी आपल्याच पक्षाच्या विरोधात असहकार पुकारून गटनेतेपदाचा राजीनामा दिला. राष्टÑवादी काँग्रेस पक्ष महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका बजावत नसून गटाच्या बैठकीत जे निर्णय होतात, ते बदलले जातात, असे सांगून काही ठरावही पक्षातील ज्येष्ठ मंडळी अचानकपणे बदलत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.


तूर्तास त्यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिला असला तरी ते येत्या काळात भाजप किंवा शिवसेनेची वाट धरण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ठाण्यात राष्टÑवादीला खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे.


राष्ट्रवादीच्या नेत्यांची शिवसेनेची छुपी मैत्री
गुरुवारी एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले. २०१७ नंतर ठाणे महापालिकेत राष्टÑवादीचे अस्तित्व कुठेही दिसत नाही. केवळ टेंडरसाठी छुपी मैत्री केली जात असून ती करायचीच असेल तर खुलेपणाने करावी, असा गंभीर आरोप त्यांनी राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता केला. गटाच्या बैठकीत काही निर्णय घेतले जातात. मात्र, प्रत्यक्ष आयत्या वेळी ते बदलले जात असून राष्टÑवादी पक्ष केवळ सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बोलत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
यासंदर्भात वारंवार विरोधी पक्षनेते, पक्षातील श्रेष्ठी यांच्याकडेसुद्धा तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, त्यातून काहीच साध्य झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.


क्लस्टरबाबत दुजाभाव
क्लस्टरचा प्रस्ताव होत असताना त्यामध्ये शास्त्रीनगरचा समावेश होता. मात्र, त्या प्रस्तावाच्या ऐवजी दुसराच प्रस्ताव मंजूर झाला आणि त्यातून शास्त्रीनगरचे नाव वगळण्यात आले. या प्रस्तावावर विरोधी पक्षनेत्यांची स्वाक्षरी असल्याचेही त्यांनी सांगितले. स्थायी समितीमध्ये राष्टÑवादीचे चार नगरसेवक जाणे अपेक्षित असताना केवळ या मंडळींच्या असलेल्या छुप्या मैत्रीच्या संबंधांमुळे तीनच सदस्य स्थायी समितीत गेले.
कोणताही ठराव करताना अथवा पक्षाची भूमिका विशद करताना गटनेते म्हणून विश्वासात घेतले जात नाही. सत्ताधारी पक्ष व प्रशासनाचे उत्तम संबंध असताना स्वीकृत नगरसेवक म्हणून आपला एक नगरसेवक निवडून न येणे आदी मुद्यांना हात घालून त्यांनी आपल्याच पक्षातील वरिष्ठांना आरोपीच्या पिंजºयात उभे केले.

पाच नगरसेवक गणेश नाईकांसोबत जाणार
राष्ट्रवादी पक्ष सोडणार का, असा सवाल त्यांना केला असता, तूर्तास तरी तसा विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, ते गणेश नाईक यांच्या संपर्कात असल्याची माहिती यानिमित्ताने समोर येत असून नाईक यांच्यासमवेत ते आणि त्यांचे इतर तीन सहकारी नगरसेवक आणि दिवा-कळव्यातील दोन नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेचीही फिल्डिंग
मात्र, दुसरीकडे जगदाळे भाजपमध्ये न जाता शिवसेनेत यावेत, यासाठी शिवसेनेकडून जोरदार फिल्डिंग लावली गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, त्यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी क्लस्टरचे आमिष दाखविले जात असून त्याच जोरावर त्यांना शिवसेनेत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली.
 

सभागृहात आम्ही नेहमी विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावलेली आहे. गटाच्या बैठकीत झालेले निर्णय बदलले जातात, असा जो काही आरोप आहे, तो चुकीचा आहे. वास्तविक, पाहता तुम्ही गटनेता होता, मग याविरोधात आवाज का नाही उठविला, पक्षाला बदनाम करण्याचे वारंवार काम आपण केले आहे. मागील १५ वर्षे आपण पक्षात विविध भूमिका बजावल्या असताना आज आपणच पक्षाला बदनाम करणे कितपत योग्य आहे.
- मिलिंद पाटील,
विरोधी पक्षनेते, ठामपा

Web Title: Hanamant Jagdale resigns as party leader of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.