हातगाडीवाल्याना खंडणीसाठी मारहाण; धमकावणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

By धीरज परब | Published: January 31, 2024 07:55 PM2024-01-31T19:55:41+5:302024-01-31T19:55:47+5:30

गेल्या अनेक काळा पासून भाईंदर पूर्व भागातील हातगाडीवाल्यांकडून वसुली करतोय खंडणी 

Handcart drivers beaten for extortion; A case has been filed against the bully | हातगाडीवाल्याना खंडणीसाठी मारहाण; धमकावणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

हातगाडीवाल्याना खंडणीसाठी मारहाण; धमकावणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्ट - इंद्रलोक परिसरात हातगाडी वाल्यां कडून खंडणी उकळणाऱ्या व खंडणी न दिल्यास मारहाण , तोडफोड करून धमकावणाऱ्या लारा नाडर नावाच्या गुंडा वर अखेर नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . 

फिर्यादी जिलाजीत यादव हे भाईंदर पूर्वेच्या फाटक मार्गावरील एका इमारतीत राहतात . त्यांनी रामेश्वर म्हस्के यांच्या कडून न्यू गोल्डन नेस्ट येथील महापालिका क्रीडा संकुल जवळ चहाचा स्टॉल लावण्यासाठी जागा भाड्याने घेतली . गेल्या चार महिन्यां पासून लारा नाडर रा .गोल्डन नेस्ट ह्याला महिना ३ हजार रुपये हप्ता यादव यांना द्यावा लागत होता . हप्ता दिला नाही व हप्ता दिल्याचे कोणाला सांगितले, तक्रार केली तर येथे धंदा लावू देणार नाही अशी धमकी त्याने दिली होती . 

२९ जानेवारी रोजी नाडर हा यादव यांच्या कडे हप्ता घेण्यासाठी आला असता यादव त्यांचा भावाचा मुलगा स्टॉल वर होते . पैसे नसल्याने हप्ता देण्यास असर्मथता यादव यांनी व्यक्त केली असता नाडर याने चहा घोटण्याच्या वस्तूने संदीपचे डोके फोडले . शिवीगाळ करत धमकी देऊन गेला .  त्याच भागात अंडागाडी लावणाऱ्या अमीना शेख हिच्या कडे नाडर हा २ हजारांचा महिना घेत होता . तिने पैसे नसल्याचे सांगितल्या वरून तिच्या गाडीवरील अंडी फोडून तिला शिवीगाळ , धमकी दिली होती . 

नवघर पोलिसांनी यादव यांच्या फिर्यादी वरून २९ जानेवारी रोजी रात्री उशिरा लारा नाडर याच्यावर खंडणी सह विविध कलमां खाली गुन्हा दाखल केला आहे . नाडर हा ह्या भागात हातगाडी - बाकडे लावणाऱ्यां कडून हप्ता गोळा करतो . हप्ता दिला नाही तर मारहाण , धमकावणे , तोडफोड असे प्रकार करतो . या भागात त्याला विचारल्या शिवाय कोणाला गाडी - बाकडं लावता येत नाही . तो स्वतः हप्ता घेऊन बाकडे - हातगाड्या लावत असल्याचा आरोप होत आले आहेत . दहशत पसरवून खंडणी वसूल करणाऱ्या लारा नाडर वर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे . 

Web Title: Handcart drivers beaten for extortion; A case has been filed against the bully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.