कौटुंबिक वादातून हाताेड्याने केली पत्नीची हत्या : पती पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:36 AM2021-07-26T04:36:25+5:302021-07-26T04:36:25+5:30

ठाणे : कौटुंबिक वादातून पत्नी माधुरी (३१) हिच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून तिचा खून केल्यानंतर पती संजय हेमराज पाटील ...

Handcuffed wife killed in family dispute: Husband passes away | कौटुंबिक वादातून हाताेड्याने केली पत्नीची हत्या : पती पसार

कौटुंबिक वादातून हाताेड्याने केली पत्नीची हत्या : पती पसार

googlenewsNext

ठाणे : कौटुंबिक वादातून पत्नी माधुरी (३१) हिच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून तिचा खून केल्यानंतर पती संजय हेमराज पाटील (३९) हा पसार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. हत्येनंतर सहा वर्षांच्या मुलीला शेजाऱ्यांकडे ठेवून पसार झालेल्या या पतीचा कळवा पोलीस शोध घेत आहेत.

संजय कोणताही कामधंदा करीत नव्हता. त्याच्यावर कर्जही झाले होते. तसेच त्याने काही जणांची फसवणूकही केल्याने त्याच्याविरुद्ध नौपाडा आणि वागळे इस्टेट या दोन पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, घरातील क्षुल्लक बाबींवरून या दाम्पत्यामध्ये नेहमीच खटके उडत होते. २३ जुलै रोजी सायंकाळी ६ ते २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्यात असाच वाद झाला. याच वादातून त्याने माधुरीच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून तिची हत्या केली. हा प्रकार कळवा येथील सुकुर पार्क येथील इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या घरात घडला. माधुरीशी कोणताही संपर्क होत नसल्यामुळे तिचे दीर तसेच तिचे चुलते त्यांच्या घरी २४ जुलै रोजी सायंकाळी पोहचले. त्यावेळी हा प्रकार समोर आला. या हत्येनंतर त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीला त्याने बाहेर खाण्यासाठी नेले. तिला शेजाऱ्यांकडे ठेवून मोबाईल बंद करून तो पसार झाला. आईच्या तोंडावर उशी होती आणि बाजूला रक्त उडाले होते. इतकीच तोकडी माहिती या मुलीने पोलिसांना आणि तिच्या नातेवाईकांना दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

माधुरीच्या डोक्यात हातोड्याने प्रहार केल्यानंतर तिला रक्ताच्या थारोळ्यात सोडून तो पसार झाला. घटनेची माहिती मिळताच कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संजय पाटील याच्याविरुद्ध पत्नीच्या हत्येचा गुन्हा २५ जुलै रोजी दाखल केला आहे.

* माहेरूनही घेतले दोन लाख रुपये

संजय बेरोजगार तर पत्नी एका ब्युटी पार्लरमध्ये कामाला जात होती. त्याने काही दिवसांपूर्वी तिच्या माहेरून दोन लाख रुपये घेतले होते, अशी माहिती तिच्या माहेरच्या मंडळीने पोलिसांना दिली आहे.

Web Title: Handcuffed wife killed in family dispute: Husband passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.