दिव्यांग फेरीवाल्यास फुकटच्या केळीं साठी मारहाण करणाऱ्या फुकटयास पकडले

By धीरज परब | Published: May 2, 2023 06:01 PM2023-05-02T18:01:06+5:302023-05-02T18:01:18+5:30

केळं खायला हवे तर एकच घे , चार नको घेऊस असे सद्दाम यांनी सांगितले असता त्याचा राग आलेला जेसन हा गुंडगिरीवर उतरला . 

Handicapped peddlers caught beating for free bananas | दिव्यांग फेरीवाल्यास फुकटच्या केळीं साठी मारहाण करणाऱ्या फुकटयास पकडले

दिव्यांग फेरीवाल्यास फुकटच्या केळीं साठी मारहाण करणाऱ्या फुकटयास पकडले

googlenewsNext

मीरारोड - फुकटची केळी बळजबरी घेऊन वर दिव्यांग फेरीवाल्यास मारहाण करणाऱ्या  जेसन डिसुझा रा. महावीर बिल्डिंग,चांदमलनगर, भाईंदर पश्चिम ह्या फुकटयास पोलिसांनी पकडले आहे . 

भाईंदर पश्चिमेस नेहरू नगर मध्ये राहणारे सद्दाम राजअली हुसेन (२९) हे दिव्यांग असून उपजीविकेसाठी हातगाडीवर केळी विकण्याचा धंदा करतात . फेरीवाला असलेले सद्दाम हे १ मे रोजी भाईंदर पश्चिमेस फाटक मार्गावर हातगाडीवर केळी ठेऊन ती विक्री करत फिरत होते . त्यावेळी जेसन ह्याने गाडीवरील चार केळी सद्दाम यांना न विचारता घेतली . केळं खायला हवे तर एकच घे , चार नको घेऊस असे सद्दाम यांनी सांगितले असता त्याचा राग आलेला जेसन हा गुंडगिरीवर उतरला . 

त्याने शिवीगाळी केली असता सद्दाम यांनी शिवीगाळ कशाला करतो म्हटले असता त्याने भर रस्त्यात सद्दाम यांना मारहाण सुरु केली . तसेच त्यांना रस्त्यावर खाली ढकलून पाडले . त्यावेळी काही जागरूक लोकांनी पुढाकार घेऊन सद्दाम याला जेसन च्या तावडीतून वाचवले . या मारहाणीत सद्दाम यांच्या खिशातील ३ हजार रोख गहाळ झाली . 

या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी जेसन याला पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे . या मारहाणीच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोकां मध्ये या मारहाणी बद्दल संताप व्यक्त होत आहे . 

Web Title: Handicapped peddlers caught beating for free bananas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.