भिवंडीत अर्धी खुर्ची नारीशक्तीच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 01:04 AM2019-04-15T01:04:06+5:302019-04-15T01:05:10+5:30
२००९ मध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यामुळे तालुक्यासह ग्रामीण भागात विकासकामांना प्रोत्साहन मिळाले.
भिवंडी : २००९ मध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यामुळे तालुक्यासह ग्रामीण भागात विकासकामांना प्रोत्साहन मिळाले. रोजगार निर्माण झाला. परिणामी, लोकसंख्या वाढली. २००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत किंचितशी वाढ झाली.
२००९ च्या निवडणुकीत आठ लाख १९ हजार ७२० पुरुष तर सहा लाख ६३ हजार ४५६ महिला, असे एकूण १४ लाख ८३ हजार १७६ मतदार होते. त्यापैकी तीन लाख ४५ हजार १७७ पुरुष व दोन लाख ३९ हजार ०५३ महिला, अशा एकूण पाच लाख ८४ हजार २३० मतदारांनी मतदान केले.
२०१४ मध्ये मतदारांची संख्या वाढली. नऊ लाख ४५ हजार २०१ पुरुष तर सात लाख ५० हजार ९८५ महिला मतदार मिळून एकूण १६ लाख ९६ हजार २१८ मतदार होते. मोदीलाटेमुळे २००९ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली. 2009 मध्ये भिवंडी मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाली. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार प्रचारात कमी पडले होते.10%गेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण तीन लाख ९३ हजार ७७० महिलांनी मतदान केले. तेव्हा महिलांची मते १० टक्क्यांनी कमी होती. 2009 मध्ये ५९ टक्के पुरुषांनी मतदान केले. मात्र, २०१४ मध्ये त्यात चार टक्क्यांनी घट होऊन ही टक्केवारी ५५ वर घसरली. तर महिलांच्या टक्केवारीत चार टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे ती ४१ (२००९ साल) वरून ४५ (२०१४) टक्क्यांवर गेली.