महापालिका शाळांमध्ये हॅण्ड सॅनिटायझर स्टेशन, शिक्षण मंडळाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 02:54 AM2018-08-18T02:54:34+5:302018-08-18T02:54:42+5:30

ठाणे महापालिका त्यांच्या प्रत्येक शाळेमध्ये हॅण्ड सॅनिटायझर स्टेशन उभारणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी हे एक पाऊल आहे.

Hands Sanitizer station in municipal schools | महापालिका शाळांमध्ये हॅण्ड सॅनिटायझर स्टेशन, शिक्षण मंडळाचा प्रस्ताव

महापालिका शाळांमध्ये हॅण्ड सॅनिटायझर स्टेशन, शिक्षण मंडळाचा प्रस्ताव

Next

ठाणे : ठाणे महापालिका त्यांच्या प्रत्येक शाळेमध्ये हॅण्ड सॅनिटायझर स्टेशन उभारणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी हे एक पाऊल आहे. याकरिता सुमारे साठ लाख रु पये खर्च येणार असून याबाबतचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी येणार आहे.
प्रशासनाचा हा प्रस्ताव शिक्षण समितीपुढे मांडून महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे मिळावेत म्हणून हा उपक्र म किती आवश्यक आहे, हे पटवून दिले. परिणामी सदस्यांनीही त्याला कोणती हरकत न देता मान्यता दिली आहे.
आजघडीला ठाणे महापालिकेच्या एकूण ५५ बालवाडी, १२१ प्राथमिक शाळा २० माध्यमिक शाळा ७८ इमारतींमध्ये आहेत. शाळा इमारतींमध्ये प्रत्येक मजल्यावर जेथे वॉशरूम आहे, तेथे हे हॅण्ड सॅनिटायझर डिस्पेन्सर मशीन लावण्याचा महापालिकेचा विचार आहे. यात मशिनसह सॅनिटायझर जेलचा पुरवठा करण्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे ५८ लाख ८३ हजार २०० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावला महासभेत नगरसेवक मंजुरी देतात का हे पाहणे औस्त्युक्याचे ठरणार आहे.
महापालिकेने आपल्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मागील काही वर्षांपासून विविध उपक्र म राबवले आहेत. याचाच भाग सर्वसामान्य घरातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभाग सातत्याने अभिनव प्रयोग करत आहेत.
यात यंदापासून ‘शाळा आपल्या दारी’ प्रयोग राबविण्यात येत आहे. त्यातच महापालिकेच्या सर्व शाळा लवकरच डिजिटल करण्यात येत आहेत. वर्गांमध्ये फळ्याची जागा ५५ इंचचा भव्य टचस्क्रि नचा एलईडी घेत आहे. तसेच साध्या सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकता यावे, यासाठी खास अ‍ॅपही तयार करण्यात येत आहे. पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळांना ८ डिजी किट्स देण्यात येणार आहेत. यामध्ये मराठी माध्यमाच्या सहा, इंग्रजी माध्यमाच्या दोन शाळांचा समावेश आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक नवनव्या गोष्टी उपलब्ध होणार आहेत.

प्रत्येकासाठी डिजीटल किट

प्रत्येक इयत्ता व वर्गासाठी डिजीटल किट तयार करण्यात आला आहे. या संचात ५० विद्यार्थ्यांसाठी रिमोट, किबोर्ड, माऊस एलईडी टचस्क्रि नचा ५५ इंचचा फळा, संगणक, वेब कॅमेरा, एव्हुलेशन किट आदींसह इतर सुविधांचा समावेश आहे.

Web Title: Hands Sanitizer station in municipal schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.