उल्हासनगरात रामनवमी उत्सवात, मनसेचे हनुमान चालीसा पठण
By सदानंद नाईक | Published: March 30, 2023 06:15 PM2023-03-30T18:15:12+5:302023-03-30T18:15:43+5:30
शहराध्यक्ष बंडू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कॅम्प नं-१ येथे रामनवमी निमित्त सकाळी साडे ११ वाजता हनुमान चालिसाचे आयोजन करण्यात आले होते.
सदानंद नाईक
उल्हासनगर : रामनवमी निमित्त संच्युरी कंपनीच्या वतीने बिर्ला विठ्ठल मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच कॅम्प नं-१ मध्ये मनसेच्या वतीने हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले असून शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उल्हासनगर कॅम्प नं-१ शहाड गावठाण येथील बिर्ला विठ्ठल मंदिरातील प्रांगणात राम जन्मोत्सव निमित्त श्री रामकिंकर विचार मिशनचे अध्यक्ष स्वामी मैथिलीशरण यांचे मानस प्रवचन २२ ते २९ मार्च २०२३ या कालावधीत सायंकाळी ७ ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आले होते. श्री मैथिली शरण आणि त्यांच्या भजन मंडळींनी अनेक राममय भजने प्रवचन दरम्यान सादर केली. यावेळी संच्युरी कंपनीच्या संतोष चितलांगे, संस्थेचे युनिट हेड दिग्विजय पांडे यांच्यासह सेंचुरी परिवारातील सदस्य उपस्थित होते. राम जन्माच्या वेळी सर्व भक्त राम झुला झुलतात आणि पुण्य कमावतात. राम जन्मोत्सवाचा संपूर्ण कार्यक्रम संतोष चितलांगे यांच्या देखरेखीखाली संपन्न झाला. शहरातील विविध भागात राम जन्मोत्सव निमित्त शोभायात्रा काढण्यात आल्या असून हजारो नागरिकांनी कार्यक्रमांत भाग घेतला. तर मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कॅम्प नं-१ येथे रामनवमी निमित्त सकाळी साडे ११ वाजता हनुमान चालिसाचे आयोजन करण्यात आले होते.