शेलार येथील हनुमान मंदिराला फळा फुलांची विशेष सजावट आरास
By नितीन पंडित | Published: April 6, 2023 07:09 PM2023-04-06T19:09:30+5:302023-04-06T19:09:52+5:30
शेलार येथील हनुमान मंदिराला फळा फुलांची विशेष सजावट आरास करण्यात आली आहे.
भिवंडी: शक्तीचे दैवत हनुमानाचा आज जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून उत्साहात साजरा होत असताना भिवंडी शहर व ग्रामीण ग्रामीण भागात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.भिवंडी शहरालगतच्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील हनुमान मंदिरात हनुमान जन्माष्टमी निमित्त हनुमान मंदिराला फळांची विशेष सजावट करण्यात आली आहे.
द्राक्ष,अननस, सफरचंद,संत्री,डाळिंब,मका,टरबूज,अशा विविध फळांचा वापर करीत मंदिराचा प्रवेशद्वार व सभामंडप येथे सजावट आरास केली असून मंदिरातील गाभाऱ्यात मिरची,कोबी,फ्लॉवर, काकडी,कोथिंबीर, मुळा अशा अनेक भाजीपाल्यांनी गाभारा सजवण्यात आला असून शेतकरी होऊ द्या श्रीमंत,बळ देईल त्याला हनुमंत अशा उल्लेखाची पाटी लावण्यात आली आहे.तसेच ग्रामस्थ मंडळा कडून मंदिरात येणाऱ्या भाविकांना सरबत वितरण करण्यात आले,तर मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी व मंदिर सजावट पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती.