कोरोनावर मात केल्यानंतर पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्हही जाहीर झाल्याने आनंद द्वीगुणित झाला
By जितेंद्र कालेकर | Published: May 9, 2020 12:04 AM2020-05-09T00:04:36+5:302020-05-09T00:10:59+5:30
ठाण्यातील खाकी वर्दीतील योद्धयाने अलिकडेच कोरोनावर विजय मिळविला. गुणवत्तापूर्ण पोलीस सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्हही जाहीर झाल्यामुळे आपला आनंद द्वीगुणित झाला असून आणखी चांगले काम करण्याची यातून स्फूर्ती मिळाल्याचा विश्वासही पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणो: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या मुंब्रा पोलीस ठाण्यातील खाकी वर्दीतील योद्धयाने अलिकडेच कोरोनावर विजय मिळविला. गुणवत्तापूर्ण पोलीस सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्हही जाहीर झाल्यामुळे आपला आनंद द्वीगुणित झाला असून आणखी चांगले काम करण्याची यातून स्फूर्ती मिळाल्याची प्रतिक्र ीया पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केली.
पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर म्हणाले, कोरोनामुळे सुरु असलेल्या संचारबंदीच्या काळात मुंब्रा पोलीस ठाण्यासारख्या आव्हानात्मक कार्यक्षेत्रात नागरिकांमध्ये या साथीच्या आजाराचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी झोकून देऊन काम केले. हे काम करीत असतानाच कोरोनाची लागण झाली. त्यावेळी मानसिकरित्या खचलो. मात्र, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकारी, सहकारी, मित्र, नातेवाईक आणि महत्वाचे कुटुंबीय खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहिल्याचे ते सांगतात. वरिष्ठांनी दिलेल्या मानसिक आधारामुळेच आपण या आजारातून सुखरूप बाहेर येऊ शकलो. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पोलीस महासंचालकाकडून आतापर्यंतच्या उल्लेखनीय सेवेचा गौरव होऊन पोलीस महासंचालक स्मृतिचिन्ह जाहीर झाले. आपल्या कामाचा वरिष्ठांकडून गौरव होत असल्याचे पाहून आणखी चांगले काम करण्याची स्फूर्ती मिळाली असून पुन्हा कामावर रु जू झाल्यावर अधिक जोमाने अशीच कामगिरी बजावण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला आहे.
* अशी आहे कामगिरी..
सध्या मुंब्रा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले क्षीरसागर हे 1991 मध्ये कॉन्स्टेबल पदावर पोलीस सेवेत भरती झाले. 2001 मध्ये ते उपनिरीक्षक झाले. पोलीस दलात 28 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी मुंबई शहर, ठाणे शहर, मुंबई लोहमार्ग आदी ठिकाणी सेवा केली. मेहनत, सचोटी आणि निष्णांत गुन्हे शोधक या गुणांमुळे आदर्श काम करणारा अधिकारी म्हणूनही त्यांची ख्याती आहे. त्यांना 56 हजार 350 रोख रकमेसह 109 बक्षिसे मिळाली आहेत. मुंब्रा पोलीस ठाण्यात त्यांनी आॅगस्ट 2018 मध्ये अनधिकृतपणे चालणारे आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज उद्ध्वस्त करु न 14 लाख 41 हजारांच्या किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यामुळे शासनाचा 36 कोटींचा महसूलही त्यांनी वाचविला. मार्च 2019 मध्ये 15 लाख 76 हजारांच्या बनावट नोटाही त्यांनी जप्त केल्या. अंमली पदार्थाची विक्र ी करणाºया आरोपींवरही त्यांनी मोठया प्रमाणात कारवाई केली. त्यांना आतार्पयत उत्कृष्ठ कामिगरीबद्दल 91 प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले आहे.
--
‘‘ हा आजार इतर आजारांप्रमाणे बरा होतो. त्यामुळे कोणीही घाबरुन जाऊ नये. फक्त तो होऊच नये यासाठी आवश्यक असणारी खबरदारी घ्यावी. स्वत:ची प्रतिकाशक्ती वाढवावी. पोलीस आयुक्त आणि सह आयुक्त यांनीही वैयक्तिकरित्या फोन करुन पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे कळविले. सर्वच वरिष्ठ अधिकारी पाठीशी असल्यामुळे मनावरचा ताणही कमी झाला. नागरिकांनीही सोशल डिस्टसिंगचे आणि स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळून खबरदारी घेणे आवश्यक आहे.’’
अरुण क्षीरसागर, पोलीस निरीक्षक, मुंब्रा