बेघर निवारा केंद्रात आनंदी अन् उत्साही वातावरण; उल्हासनगरात शेकडो बेघरांना मिळाला हक्काचा निवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 05:23 PM2020-11-05T17:23:48+5:302020-11-05T17:23:53+5:30
रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, रस्त्याला कडेला निचपत व जीवनाच्या शेवटच्या घटका मोजत असल्याचे शेकडो भिक्षुक दिसत असल्याचे चित्र यापूर्वी होते.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : रेल्वे, बस स्थानक, मंदिर, मार्केट, बाजारपेठ, रस्त्याच्या आश्रयाला व निवारा नसलेल्या शेकडो नागरिकांचे पालकत्व शहर बेघर निवारा केंद्राने स्वीकारला. निवारा केंद्रात सर्वसुखसुविधा पुरविल्या जात असून जीवनाचा शेवटचा श्वास आनंदाने हक्काच्या घरात घेणार असल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आहे.
शहरातील बस स्थानक, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, रस्त्याला कडेला निचपत व जीवनाच्या शेवटच्या घटका मोजत असल्याचे शेकडो भिक्षुक दिसत असल्याचे चित्र यापूर्वी होते. बेघर असल्याने स्वाभिमानाने जगता यावे म्हणून केंद्र शासनाने दीनदयाल उपाध्याय यांच्या नावाने शहर बेघर निवारा केंद्र महापालिकेच्या नियंत्रणाखाली सामाजिक संस्था चालवित आहेत. जवळचे कोणतेही नातेवाईक नसलेल्या बेघर नागरिकांचे सर्वेक्षण केल्यावर शहरात ८५ नागरिकांची नोंद झाली. त्यांच्या सोयीसाठी फॉरवर्ड लाईन व गोलमैदान परिसरात महापालिका शाळा क्रं-२७ मधील बंद शाळा इमारत व समाजमंदिरात शहर बेघर केंद्र सुरू केले. बेघर निवारा केंद्रात बेघर नागरिकांना आल्यावर त्यांच्या आरोग्याची काळजी करावी लागते. दर आठवड्याला त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. तसेच सकाळी चहा, नाष्टा, दुपारी व सायंकाळी जेवण तसेच आठवढ्यातून तीन वेळा नॉनवेज दिला जात आहे.
शहरात ८० पेक्षा जास्त बेघर नागरिकांना बेघर निवारा केंद्रात हक्काचे घर मिळाले. अंबरनाथ व बदलापूर येथेही दोन बेघर निवारा केंद्र असून त्यामध्ये ६० पेक्षा जास्त वरिष्ठ नागरिक आनंदाने जीवन जगत असल्याची माहिती सत्यवान जगताप यांनी दिली. बेघर निवारा केंद्र चालविणे ही खरी समाजसेवा असून केंद्रात असलेले सर्व जण वरिष्ठ नागरिक आहेत. यामध्ये महिलांचाही भरणा आहे. अनेक बेघर नागरिक स्वतः बाबत माहिती लपवित असल्याची महिती संस्था चालक सांगतात. त्यांना भीती असते की, ज्या आपतीयांनी छेडले, घरारून बाहेर काढले. त्यांच्या पासून दोन हात लांब राहीलेले चांगले. असे त्यांना वाटते. त्यांच्याकडे गेलेतर, पुन्हा रस्त्यावर राहावे लागेल. या भीतीतूनते काही एक बोलत नाहीत. पिण्यासाठी व आंघोळ करण्यासाठी गरम पाणी, साबण, कपडे दिले जाते.
कोरोनावर अनेकांनी केली मात
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर बेघर निवासी केंद्रातील कर्मचारी व बेघर नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र सर्वांनी कोरोनावर मात केल्याची माहिती केंद्राच्या व्यवस्थापक ममता पांडे, महेश सुरवाडे व विजय बिडवान यांनी दिली आहे. तसेच शहरात बेघर असलेले नागरिक असतील तर त्यांनी संस्थे सोबत संपर्क करण्याचे आवाहन पांडे यांनी केले.