उन्हाळी शिबिराचा दिव्यांग मुलांसह त्यांच्या पालकांनी लुटला आनंद, मनोरंजक व नाविन्यपूर्ण उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 04:58 PM2019-04-25T16:58:40+5:302019-04-25T17:01:04+5:30

दिव्यांग मुलांचे, पालकांचे आयुष्य आनंदमय होण्यासाठी उन्हाळी शिबीर आयोजित केले होते.

Happy parents, lively, entertaining and innovative activities looted by their parents. | उन्हाळी शिबिराचा दिव्यांग मुलांसह त्यांच्या पालकांनी लुटला आनंद, मनोरंजक व नाविन्यपूर्ण उपक्रम

उन्हाळी शिबिराचा दिव्यांग मुलांसह त्यांच्या पालकांनी लुटला आनंद, मनोरंजक व नाविन्यपूर्ण उपक्रम

Next
ठळक मुद्देउन्हाळी शिबिराचा दिव्यांग मुलांनी लुटला आनंदअतिशय मनोरंजक व नाविन्यपूर्ण पद्धतीचे उपक्रम आँचल व्होकेशनल सेंटरच्या वतीने उन्हाळी शिबिर

ठाणे : उन्हाळी शिबिरात खास दिव्यांग मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी आयुष्य आनंदमय होण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले. अतिशय मनोरंजक व नाविन्यपूर्ण पद्धतीचे उपक्रम आयोजित करून दिव्यांग मुलांच्या कलागुणांना वाव देण्यात आला.

आँचल व्होकेशनल सेंटर "पॅटरन चॅरिटेबल ट्रस्ट' व्यवस्थापन"यांच्या वतीने आँचल व्होकेशनल सेंटरच्या दिव्यांग मुलांचे, पालकांचे दोन दिवसीय "उन्हाळी शिबिर" सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत , वेलफेअर सेंटर, समतानगर, ठाणे येथे आयोजित करण्यात आले होते . या शिबिरात पहिल्या दिवशी दुपारी ११:१५ वा. लहान मुलांचे प्रसिद्ध आहारतज्ञ तोरल शहा यांनी अतिशय मनोरंजक व नाविन्यपूर्ण पद्धतीने मार्गदर्शनाखाली दिव्यांग मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी गॅस न वापरता अतिशय मनोरंजक व नाविन्यपूर्ण पद्धतीने ''ठंडा ठंडा कूल कूल'' अनुभव देणारे ''पुदिना सरबत'' टँगी मिंट पंच व खमंग मक्याचे चाट कोन कॉर्न या खाद्य पदार्थाचे प्रात्याशिक करून दाखवले. दुपारी २ ते ४ वा. विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला विषयाची आवड निर्माण होण्यासाठी मुलांना आपल्या चित्रकलेच्या केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यातील नैसर्गिक निरागसता चित्रांच्या माध्यमातून रेखाटण्याचा प्रयत्न जेष्ठ चित्रकार शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्यावरील तैल रंगातून नैसर्गिक मार्बल पेंटीगचे प्रात्याशिक "मातीचे पॉट व कागद यावर करून दाखवले ". दुसऱ्या दिवशी सकाळी ११ ते १ वा गीतकार जय सरगम यांनी मुलांचे गोरी गोरी पान फुला सारखी छान , नाचरे मोरा या बालगीते व कोळीगीते वर नृत्ये करून घेतली तर दुपारी २ ते ४ डॉ मंजिरी देव यांच्या शिष्या कथ्थक नृत्यालंकार डॉ रूपाली देशपांडे यांनी" बजने दे धडक धडक" या गाण्यावर नृत्याचे धडे सर्व मुलांना दिले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विक्रांत अकारते, गणेश मुदलियार, जमानालाल अभिचंदानी, टॉनी डीमीलो, ईश्वरी अभिचंदानी, शिक्षक श्वेता शेट्ये, सुलभा शेट्टी, मृदुला कांबळे ,संगीता पाटील ,संगीता मोरे, वैशाली , मिताली कांबळे ,लता लखवाणी आणि "पॅटरन चॅरिटेबल ट्रस्ट' व्यवस्थापन अध्यक्ष बलदीप डोगरा"व आँचल व्होकेशनल सेंटर संचालिका ईश्वरी गुलरजानी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Happy parents, lively, entertaining and innovative activities looted by their parents.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.