बँकेचे हप्ते फेडण्यासाठी विवाहितेचा छळ : सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:42 AM2021-08-23T04:42:31+5:302021-08-23T04:42:31+5:30

ठाणे : मोटारकार खरेदीसाठी, तसेच बँकेचे हप्ते फेडण्यासाठी पत्नीचा छळ करणाऱ्या पतीसह सासू, सासरे अशा सासरच्या सहा जणांविरुद्ध शनिवारी ...

Harassment of a married woman for paying bank installments: Crime against father-in-law's congregations | बँकेचे हप्ते फेडण्यासाठी विवाहितेचा छळ : सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा

बँकेचे हप्ते फेडण्यासाठी विवाहितेचा छळ : सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा

Next

ठाणे : मोटारकार खरेदीसाठी, तसेच बँकेचे हप्ते फेडण्यासाठी पत्नीचा छळ करणाऱ्या पतीसह सासू, सासरे अशा सासरच्या सहा जणांविरुद्ध शनिवारी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय ४ लाख ६९ हजारांच्या स्त्री धनाचा अपहारही केल्याचा आरोप या विवाहितेने केला आहे.

कोपरीमध्ये वास्तव्यास असलेल्या या ३० वर्षीय विवाहितेने २१ ऑगस्ट २०२१ रोजी ही तक्रार दाखल केली आहे. तिच्या तक्रारीनुसार पती मयूर जगताप, सासू प्रमिला, नणंद दीपा, नंदोई संदीप मैनकर, नणंद श्रद्धा आणि नंदोई अविनाश खोमणे आदींनी १३ जून २०१९ ते २८ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत कट रचून तिचा छळ केला. कहर म्हणजे लग्नाआधीच मयूर याचे दुसऱ्या महिलेबरोबर विवाहबाह्य संबंध आहेत, ही बाब लग्न ठरवितेवेळी तिच्यापासून तसेच तिच्या आई-वडिलांपासून लपवून ठेवली. तिच्या नोकरीतून मिळणारा पगार तसेच तिच्या आई-वडिलांच्या संपत्तीवर नजर ठेवून हेतुपूर्वक फसवणूक केल्याचेही तिने या तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय, तिच्याकडे मोटारकार खरेदी आणि बँकेचे हप्ते भरण्यासाठीही पैशांची मागणी केली. ती पूर्ण न केल्याने तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन वेळोवेळी शिवीगाळ आणि धक्काबुक्की करीत ठार मारण्याचीही धमकी दिली. त्यातच छोटा नंदोई अविनाश याने तर तिचा विनयभंगही केल्याचा आरोप आहे. शिवाय, तिच्या ३ लाख ६० हजारांच्या दागिन्यांसह ४ लाख ६९ हजारांच्या स्त्री धनाचाही त्यांनी अपहार केला. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात मारहाण, धमकी देणे, शिवीगाळ करणे, हुंड्यासाठी छळ करणे आणि विनयभंगाच्या कलमानुसार या विवाहितेने ठाणे न्यायालयात तक्रार दिली. कलम १५६ नुसार ही तक्रार दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Harassment of a married woman for paying bank installments: Crime against father-in-law's congregations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.