भिवंडीत हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासू सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल

By नितीन पंडित | Published: April 27, 2023 05:09 PM2023-04-27T17:09:39+5:302023-04-27T17:09:50+5:30

पती व सासू सासरे यांनी प्रिया हिने आई-वडिलांकडून पाच लाख रुपये आणावे यासाठी तिला मारहाण करीत शारीरिक व मानसिक छळ सुरू केला होता.

Harassment of brides for dowry in Bhiwandi; Case filed against husband along with mother-in-law | भिवंडीत हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासू सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल

भिवंडीत हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासू सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext

भिवंडी- पनवेल येथे राहणाऱ्या विवाहित महिलेस पती व सासू-सासरे हे हुंडा म्हणून पाच लाख रुपयांची मागणी करीत मानसिक व शारीरिक छळ करत असल्याने विवाहितेने दिलेल्या तक्रारी वरून बुधवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात पती व सासू-सासरे यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 टेमघर येथे राहणारी प्रिया अतुल चौधरी वय ३४ हीचे लग्न पनवेल येथील अतुल मुन्नेलाल चौधरी यासोबत पाच वर्षांपूर्वी झाले होते.प्रिया ही पती अतुल तसेच सासू यशोदा चौधरी व सासरे मुन्नेलाल चौधरी यांच्यासोबत करंजाडे पनवेल या ठिकाणी राहत होती. पती व सासू सासरे यांनी प्रिया हिने आई-वडिलांकडून पाच लाख रुपये आणावे यासाठी तिला मारहाण करीत शारीरिक व मानसिक छळ सुरू केला होता.

या त्रासाला कंटाळून प्रिया ही आपल्या वडिलांच्या घरी येऊन राहत होती.प्रिया हिने  शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी पती अतुल व सासू सासरे अशा तिघां विरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Harassment of brides for dowry in Bhiwandi; Case filed against husband along with mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.