भिवंडीत विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल

By नितीन पंडित | Published: June 7, 2023 07:21 PM2023-06-07T19:21:25+5:302023-06-07T19:21:53+5:30

पैसे आणले नाही तर घटस्फोट देण्याची धमकी पतीने दिली होती.

Harassment of married women in Bhiwandi; A case has been filed against the husband and in-laws | भिवंडीत विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल

भिवंडीत विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext

नितीन पंडित
भिवंडी:
विवाहित पत्नीवर संशय घेऊन विवाहित पत्नीच्या घरून पन्नास हजार रुपये घेऊन येण्याचे सांगत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या चार जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आलिशा गणेश न्यालपेल्ली वय २५ वर्ष असे सासरच्या मंडळींकडून छळ होणाऱ्या पिडीत विवाहितेचे नाव आहे.तर गणेश पंढरी न्यालपेल्ली वय ३१ वर्ष,पंढरी न्यालपेल्ली वय ६२ वर्ष, रेखा पंढरी न्यालपेल्ली वय ५२ वर्ष,मोनिका  पंढरी न्यालपेल्ली  वय २३ वर्ष सर्व राहणार रावजी नगर कामतघर असे विवाहितेच्या छळ प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या मंडळींची नावे आहेत. अलिशा हिचा विवाह १७ फेब्रुवारी २०२२ रोजी गणेश याच्याशी झाला होता. लग्नानंतर पती व सासरच्या मंडळींनी आलिशा हिच्यावर संशय घेऊन लहान सहन कारणावरून तिच्यासोबत भांडण करून तिला बाहेर फिरण्यास बंदी घालून माहेरून ५० हजार रुपये घेऊन येण्याचा तगादा लावला होता.

पैसे आणले नाही तर घटस्फोट देण्याची धमकी पतीने दिली होती,या सर्व घटनांचा आलिशास शारीरिक मानसिक त्रास झाल्याने अखेर सासरच्या मंडळींच्या सततच्या छळाला कंटाळून आलिशाहीने नारपोली पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Harassment of married women in Bhiwandi; A case has been filed against the husband and in-laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.