अत्याचाराच्या ४ आरोपींना कठोर शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 11:10 PM2019-03-08T23:10:25+5:302019-03-08T23:10:30+5:30
लैंगिक अत्याचार आणि खुनाच्या चार प्रकरणांमधील चारही आरोपींना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी कठोर शिक्षा सुनावली.
ठाणे : लैंगिक अत्याचार आणि खुनाच्या चार प्रकरणांमधील चारही आरोपींना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी कठोर शिक्षा सुनावली. चारही घटना बाल अत्याचाराशी संबंधित आहेत. चारपैकी तीन घटनांमध्ये आरोपींनी अत्याचार करुन पीडितांचा निर्घृण खून केला होता. एका घटनेत तर पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिच्या कानातील सोन्याच्या रिंगा आरोपीने दाताने तोडल्या होत्या. महिला दिनीच न्यायालयाने आरोपींना कठोर शिक्षा सुनावून, बाल अत्याचाराविषयीची न्यायव्यवस्थेची भूमिका स्पष्ट केली आहे. चारही प्रकरणांचे निकाल देणाऱ्या न्यायाधीश महिला असून, सरकारी पक्षाचे कामकाज सांभाळणाऱ्या वकीलही महिलाच आहेत.
>ही चारही प्रकरणे बोर्डावर आल्यानंतर अडीच महिन्यात अंतिम टप्यात आणली. न्यायालयाने शुक्रवारी या प्रकरणांचा निपटारा केला. न्यायालयाच्या निकालामुळे पीडितांना न्याय मिळाला आहे.
- उज्ज्वला मोहोळकर,
सरकारी वकील