कसाबला फासापर्यंत पोहोचवणाऱ्या साक्षीदाराची मृत्यूशी झुंज अपयशी, हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 04:52 PM2020-05-27T16:52:49+5:302020-05-27T16:55:34+5:30
कामा रुग्णालयाबाहेर दहशतवाद्यांच्या बंदुकीतून गोळ्या झेलणारे हरिश्चंद्र श्रीवर्धनकर मे महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत चिंचपोकळी येथे फूटपाथवर आढळले होते.
मुंबईवर झालेल्या भीषण २६/११ दहशतवादी हल्ल्यात एकमेव जिवंत सापडलेला दहशतवादी अजमल कसाब याची ओळख पटवणारे साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. प्रदीर्घ आजारानंतर त्यांचे राहत्या घरी निधन झाले आहे. कामा रुग्णालयाबाहेर दहशतवाद्यांच्या बंदुकीतून गोळ्या झेलणारे हरिश्चंद्र श्रीवर्धनकर मे महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत चिंचपोकळी येथे फूटपाथवर आढळले होते. त्यानंतर त्यांना त्यांच्या कल्याण येथील कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आलं.
काही दिवसांपूर्वी श्रीवर्धनकर यांना कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कल्याण डोंबिवलीचे भाजप नगरसेवक दया गायकवाड यांनी हरिश्चंद्र यांना रुग्णालयात दाखल केले होते. हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस कल्याणमधील आयुष हॉस्पिटलमध्ये भेटीला गेले होते. फडणवीस यांनी त्यांच्या उपचारासाठी भाजपकडून १० लाखाच्या मदतीची घोषणा देखील केली होती.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान श्रीवर्धनकर यांना एक गोळी देखील लागलेली होती. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी कसाबला फाशी देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे श्रीवर्धनकर हे मुख्य साक्षीदारांपैकी एक होते. हरिश्चंद्र श्रीवर्धनकर हे कसाबला ओळखणारे पहिले साक्षीदार होते. कसाबला फासावर लटवणाऱ्या मुख्य साक्षीदारांपैकी ते एक होते. हरिश्चंद्र यांनी विशेष न्यायालयासमोर कसाबला ओळखले होते आणि त्याच्याविरुद्ध साक्ष दिली होती. त्यांच्या पाठीत कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईलने घातलेल्या दोन गोळ्या लागल्या होत्या. त्यांनी आपल्या ऑफिसच्या बॅगने इस्माईलला मारलेही होते.
अलीकडेच मुंबईतील चिंचपोकळी येथील सातरस्ता येथील दुकानाचे दुकानदार डिन डिसूजा यांना श्रीवर्धनकर रस्त्यावर बसल्याचे आढळून आले होते. माणुसकीच्या नात्याने त्यांनी त्यांना आसरा दिला. अन्न - पाण्याशिवाय श्रीवर्धनकर हे वृद्ध आजोबा रस्त्यावर राहत होते. श्रीवर्धनकर यांना त्यांच्या कुटुंबाने घराबाहेर काढले असून नाईलाजाने त्यांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली होती. त्यानंतर सामाजिक संस्थेच्या मदतीने दुकानदाराने श्रीवर्धनकरांना मदत केली होती आणि पोलिसांच्या मदतीने कुटुंबाशी भेट घडवली होती.
कसाबला फासापर्यंत नेणाऱ्या साक्षीदाराची झुंज संपली, हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचे वृद्धापकाळाने निधन https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) May 27, 2020
२६/११ च्या हल्ल्यातील साक्षीदार हरिशचंद्र श्रीवर्धनकर यांना भाजपाकडून 10 लाखांचा चेक
हॉर्न वाजवण्यास मनाई केल्याने तरुणावर कोयत्याने वार
धक्कादायक! एकमेकांच्या मिठीत आईसह दोन मुलींचे मृतदेह आढळल्याने खळबळ