कोणी पाहिली का हो ‘अबोली’?

By admin | Published: February 17, 2017 02:08 AM2017-02-17T02:08:55+5:302017-02-17T02:08:55+5:30

महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य परिवहन विभागाने अबोली रंगाच्या रिक्षांची खास तरतूद केली. ठाण्यात मोठ्या प्रमाणावर हा प्रयोग यशस्वीही

Has anyone seen 'Aboli'? | कोणी पाहिली का हो ‘अबोली’?

कोणी पाहिली का हो ‘अबोली’?

Next

प्रशांत माने / कल्याण
महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य परिवहन विभागाने अबोली रंगाच्या रिक्षांची खास तरतूद केली. ठाण्यात मोठ्या प्रमाणावर हा प्रयोग यशस्वीही झाला. मात्र, कल्याण आरटीओच्या हद्दीत २७ महिलांनी या रिक्षांचे परमिट घेतले आहे. त्यापैकी आठ जणींनी रिक्षाही घेतल्या आहेत, मात्र त्या रस्त्यावर धावताना दिसत नाहीत.
महिलांना स्वयंरोजगार मिळावा, यासाठी अबोली रिक्षांचा उपक्रम राज्य सरकारने हाती घेतला. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. अन्य शहरांमध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांची सबलीकरणाकडे वाटचाल सुरू असताना कल्याण हद्दीत मात्र याउलट चित्र आहे.
ठाणे शहरात सुमारे २५ हजारांहून अधिक रिक्षा धावतात. ठाण्यात घडलेल्या स्वप्नाली लाड प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अबोली रिक्षा सुरू करताना महिलांच्या सुरक्षेचा हेतूही समोर होता. ठाण्यात अबोली रिक्षाच्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. सध्या ९० च्या आसपास महिला रिक्षा चालवत आहेत. दुसरीकडे कल्याण आरटीओने २७ महिलांना अबोली रिक्षाचे परमिट दिले आहे. यातील आठ महिलांनी रिक्षाही घेतल्या आहेत. परंतु, यातील एकही रिक्षा अजूनही रस्त्यावर धावलेली नाही. परमिट घेतले, मग रिक्षा चालवणार तरी कधी, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
परमिट घेऊन ते अन्य रिक्षाचालकांना चालवण्यास दिल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी आरटीओने करणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Has anyone seen 'Aboli'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.