ठाण्यातील संगीत कट्ट्यावर 'गीतरामायण' सादरीकारणातून केला महिलांच्या कर्तुत्वाला सलाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 03:39 PM2019-03-09T15:39:50+5:302019-03-09T15:41:05+5:30
८ मार्च जागतिक महिला दिन. हा दिवस नारीशक्तीच्या सन्मानार्थ संपुर्ण जगभरात साजरा केला जातो.
ठाणे : आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करून पुरुषांपेक्षा स्त्री कुठल्याही बाबतीत कमी नाही हे सिद्ध करतेय. कधी आई कधी बहीण कधी सखी पत्नी कधी मुलगी म्हणून आपल्या आयुष्यात स्त्रीच स्थान महत्वाचा आहे म्हणून एक दिवस तिच्या सन्मानार्थ तिच्या त्यागासाठी तिच्या कर्तृत्वासाठी तिच्या अस्तित्वाला सलाम करण्यासाठी साजरा केला जातो. संगीत कट्टा ४० वर देखील सुरांच्या साथीने महिलांच्या कर्तुत्वाला सलाम करण्यात आला.
संगीत कट्ट्यावर महिला दिन विशेष कार्यक्रमात स्वरवंदना प्रस्तुत 'गीतरामायण' हा कार्यक्रम सादर करण्यात आला.ह्या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम महिलांनी सादर केला. गीतरामायण म्हणजे एकाच कवीने रचलेला त्यांनीच संगीतबद्ध केलेला एक अभूतपूर्व संगीतकार्यक्रम.आदरणीय बाबूजी म्हणजेच सुधीर फडके ह्यांचा हा अद्भुत कलाविष्कार. रामायणातील प्रत्येक प्रसंग व्यक्तिविशेष शब्दातून संगीतातून तितक्याच प्रखरतेने अनुभवयास मिळणे हीच गीतरामायनाची खासीयत. महिला दिन विशेष संगीत कट्ट्यावर स्वरवंदना प्रस्तुत गीतरामायण देखील तितक्याच प्रभावीपणे तितक्याच सहजतेने रामायणाचे चित्र उभारून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. 'स्वये श्री रामप्रभु ऐकती','दशरथ घे हे पायसदान','राम जन्माला गं सखी',ज्येष्ठ तुझा पुत्र दे मज', 'मार ही त्राटीका रामचंद्रा','स्वयंवर झाले सीतेचे''पराधीन आहे जगती','सेतू बांधारे सागरी','भूवरी रावांवढं जाहला', 'गा बाळांनो श्रीरामायण' या व अशा अनेक गीतांच्या सुरेल सादरीकरणाने रामायणातील प्रत्येक प्रसंग श्रोत्यांसमोर चित्रस्वरूपातच उभे केले. सदर कार्यक्रम वंदना कुलकर्णी,प्रांजली जोशी,सविता भट,आशा जोशी,शुभांगी डिचोलकर,वंदना विद्वांस ह्यांच्या सुरेल स्वरात सादर झाला.संवादिकेची जबाबदारी वंदना विद्वांस ह्यांनी सांभाळली. प्रतीक चाळके ह्यांनी सादर गीतरामायणाला तबल्याची उत्तम साथ दिली.सदर कार्यक्रमाच्या संवादिकेची जबाबदारी वंदना विध्वंस यांनी सुरेख पार पाडली .
'बाबूजींनी अजरामर केलेलं गीतरामायण आज महिला दिन विशेष कार्यक्रमात स्वरवंदना संचाच्या महिला गायकांनी तितक्याच प्रभावीपणे सादर केले.नवोदित हौशी गायकांसाठी हक्काचं व्यासपीठ असलेल्या संगीत कट्ट्यावर स्वरवंदना संचाचे गीतरामायण ही एक अद्भुत कलाकृती सुरेल सुमधुर वातावरणात सादर झाली हेच संगीत कट्टयाचं यश आहे,असे मत अभिन कट्टा, संगीत कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले. महिला दिन विशेष संगीत कट्टा क्रमांक ४० ची सुरूवात स्वरवंदना संचाच्या सर्व महिला कलाकारांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून झाली.सदर कार्यक्रमाचे निवेदन अभिनय कट्ट्याच्या कलाकार माधुरी कोळी ह्यांनी केले.