मीरा रोड स्थानकात फेरीवाले ; पालिका, रेल्वेचे दुर्लक्ष : अधिका-यांवर कारवाईची मागाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 02:19 AM2017-10-11T02:19:41+5:302017-10-11T02:20:34+5:30
एलफिन्स्टन पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीत २३ जणांचा बळी गेल्यानंतरही मीरा-भाईंदर महापालिका व रेल्वे प्रशासनाच्या आशिवार्दाने मीरा रोड रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांनी व्यापलेलाच आहे.
मीरा रोड : एलफिन्स्टन पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीत २३ जणांचा बळी गेल्यानंतरही मीरा-भाईंदर महापालिका व रेल्वे प्रशासनाच्या आशिवार्दाने मीरा रोड रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांनी व्यापलेलाच आहे. मनसे पाठोपाठ शिवसेनेने या विरोधात आंदोलन करुनही ठोस कारवाईच होत नसल्याने मनसेने निषेध केला. आयुक्तांकडे कारवाई न करणाºया भ्रष्ट व कामचुकार अधिकारी, कर्मचाºयांवर कारवाईची मागणी केली आहे.
मीरा रोड व भार्इंदर रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल तसेच स्थानक परिसर फेरीवाले आणि अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी होऊ लागली आहे. मनसेने तर दुघर्टनेच्या दुसºयाच दिवशी भार्इंदर व मीरा रोड स्थानक व परिसरातील फेरीवाले, बेकायदा पार्किंग आदी संदर्भात स्टेशन मास्तर, रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी यांना भेटून कारवाईची मागणी केली.
मनसे पाठोपाठ शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनीही दोन्ही स्थानकांच्या स्टेशन मास्तरांना निवेदन देत फेरीवाल्यांना गुलाब देऊन गांधीगिरी केली. फेरीवाल्यांना बसू न देण्यासाठी शिवसैनिकांचे पथक तैनात करणार असे सरनाईक यांनी सांगितले.
लगेच दुसºया दिवसांपासून मीरा रोड स्थानक परिसर व येण्याजाण्याचे मार्ग फेरीवाल्यांनी बळकावले. या विरोधात काही दिवस शिवसैनिक व मनसैनिकांनी रात्रीची पाळत ठेवली. पण फेरीवाले मात्र शिवसैनिक आणि मनसैनिकांची पाठ फिरताच पुन्हा बस्तान मांडून बसले आहेत.
त्यातच कहर म्हणजे महापालिका व रेल्वे फेरीवाल्यांना हटवण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत. यात हद्दीचा वाद पुढे केला जात आहे. दुसरीकडे नयानगर पोलिसांनीही फेरीवाल्यांवर कारवाईचा देखावा करणाºया पालिका व रेल्वेकडे बघ्याची भूमिका घेतली आहे.
फेरीवाल्यांनी सर्रास मीरा रोड स्थानक परिसर व येण्याजाण्याच्या मार्गावर अतिक्रमण केले आहे. फेरीवाल्यांना हटवण्यासाठी सातत्याने त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई, पोलीस व पालिकेचे सुरक्षा रक्षक तैनात करावेत, फौजदारी गुन्हे दाखल करावेत आदी मागण्या मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. नरेश गीते व उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांना भेटून केल्या आहेत.