तर फेरीवालेही टाय सूट घालून धंदा करतील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 07:28 PM2017-09-25T19:28:27+5:302017-09-25T19:28:50+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात फेरीवाल्यांना काही एक स्थान नाही. फेरीवाले ही टाय सूट घालून धंदा करतील. स्मार्ट सिटी प्रकल्प फेरीवाल्यांना हद्दपार करु शकत नाही.
डोंबिवली-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात फेरीवाल्यांना काही एक स्थान नाही. फेरीवाले ही टाय सूट घालून धंदा करतील. स्मार्ट सिटी प्रकल्प फेरीवाल्यांना हद्दपार करु शकत नाही, असा इशारा कष्टकरी हॉकर्स भाजी विक्रेता संघटनेचे सल्लागार प्रशांत सरखोत यांनी दिला आहे.
डोंबिवली पूव्रेतील शुभमंगल कार्यालयात फेरीवाल्यांचा मेळावा आज पार पडला. यावेली ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी प्रकल्प फेरीवाल्यांना पिटाळून लावणारा असला तरी फेरीवाल हटणार नाहीत. महापालिकेतील लोकप्रतिनिधींनी मोक्याचा जागा गिळंकृत करुन त्यावर बेकायदा बांधकामे उभारली आहेत. बेकायदा बांधकामे पाडण्याऐवजी फेरीवाल्यावर कारवाई केली जाते. जो बेकायदा बांधकामे करुन त्यासाठी हप्ते घेतात. ते शहर स्मार्ट काय करणार असा संतप्त सवाल सरखोत यांनी उपस्थित केला आहे.
फेरीवाला कायद्यानुसार फेरीवाल्यांच्या विरोधात महापालिका कारवाई करु शकत नाही. महापालिकेने फेरीवाला पथक स्थापन करुन ही कारवाई सातत्याने सुरु ठेवली आहे. कारवाई करुन सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला जात आहे. न्यायालयाने फेरीवाला कारवाईवर बंदी घातलेली असताना कारवाई केली जात आहे.
फेरीवाला कायद्याची अंमबजावणीच केली जात नाही. काय कायदा कागदावरच राहिला आहे. महापालिकेकडून न्यायालयाचा अवमान सुरु आहे. महापालिकेने फेरीवाल्यांचे सव्रेक्षण केले अहे. सव्रेक्षणानुसार 8923 फेरीवाले आहेत. त्याची यादी महापालिकेने अद्याप वेबसाईटवर टाकलेली नाही. यादी टाकणो बंधनकारक होते. महापालिकेने केवळ 5क् टक्केच फेरीवाल्यांचे सव्रेक्षण केलेले आहेत. अद्याप 5क् टक्के फेरीवाल्यांचे सव्रेक्षण बाकी आहे.
जीएसटी कर लागू केल्याने ग्राहक मॉल्स हॉटेल्समध्ये जात नाही. त्यामुळे जास्तीत जास्त खरेदी फेरीवाल्याकडे केली जाईल. जीएसटीमुळे फेरीवाल्यांची संख्या वाढत असल्याने सरकारच फेरीवाला वाढण्यास जबाबदार असल्याचा आरोप सरखोत यांनी केला आहे.