शेअरींग रिक्षामध्ये प्रवासी बनून चाकूच्या धाकावर सहप्रवाशाला लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 08:48 PM2020-12-30T20:48:56+5:302020-12-30T20:51:36+5:30

ठाण्यातील कँडबरी जंक्शन येथे शेअरींग रिक्षामध्ये बसलेल्या सचिन तांबे (४०, रा. मुलूंड) या सहप्रवाशाला चाकूच्या धाकावर एका महिलेसह दोघांनी लुटल्याची घटना नुकतीच घडली.

He became a passenger in a sharing rickshaw and stabbed a fellow passenger | शेअरींग रिक्षामध्ये प्रवासी बनून चाकूच्या धाकावर सहप्रवाशाला लुबाडले

नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा

Next
ठळक मुद्दे ठाण्यातील धक्कादायक प्रकार नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कँडबरी जंक्शन येथे शेअरींग रिक्षामध्ये बसलेल्या सचिन तांबे (४०, रा. मुलूंड) या सहप्रवाशाला चाकूच्या धाकावर एका महिलेसह दोघांनी लुटल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात रिक्षा चालकासह तीन अज्ञात चोरटयांविरुद्ध मंगळवारी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
ठेकेदार असलेले तांबे हे २६ डिसेंबर २०२० रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास कॅडबरी सिग्नल येथे शेअर रिक्षामध्ये बसले होते. ते तीन हात नाका येथे गेल्यानंतर त्यांच्या बाजूला बसलेल्या एका भामटयाने त्यांना चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर त्याने आणि त्याच्यासोबत असलेल्या महिलेने तांबे यांच्याकडील तीन हजारांचा मोबाईल, पाच हजारांचे घडयाळ आणि तीनशे रुपयांची रोकड असा नऊ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला. नंतर त्यांना विवियाना मॉलजवळील ठाणे- मुंबई पूर्व द्रूतगती मार्गावर सोडून रिक्षा चालकासह तिघांनी तिथून पलायन केले. याप्रकरणी तांबे यांनी २९ डिसेंबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शेअरिंगने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकाच कुटूंबातील तिघांना रिक्षाने प्रवासाची परवानगी आहे.
सध्या शेअरिंग रिक्षामध्येही केवळ दोनच प्रवाशांना परवानगी दिलेली आहे. प्रवाशांनीही आधीच दोघे बसलेल्या रिक्षामध्ये प्रवास करु नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दोन पेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक करणाºया रिक्षांवरही कारवाई केली जाणार असल्याचेही या अधिकाºयाने सांगितले.

 

Web Title: He became a passenger in a sharing rickshaw and stabbed a fellow passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.