खासदार झाले नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:52 AM2021-06-16T04:52:49+5:302021-06-16T04:52:49+5:30
ठाणे : अ. भा. मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी अध्यक्षपदी खासदार राजन विचारे यांची निवड केल्यानंतर उर्वरित ...
ठाणे : अ. भा. मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी अध्यक्षपदी खासदार राजन विचारे यांची निवड केल्यानंतर उर्वरित पदांसाठीच्या नावांसाठी शनिवारी गडकरी रंगायतन येथे बैठक झाली. यात नाट्य परिषद ठाणेची २०२१-२०२३ या कालावधीसाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या वेळी कार्याध्यक्ष, सह खजिनदार, अंतर्गत हिशेब तपासणीस इ. अतिरिक्त पण महत्त्वाच्या पदांचा आणि जबाबदारीचा विचार करून कार्यकारिणी समिती गठीत करण्यात आली.
यानुसार अध्यक्ष : खा. राजन विचारे, कार्याध्यक्ष : विद्याधर ठाणेकर, उपाध्यक्ष : दुर्गेश आकेरकर व मोहन पवार, खजिनदार : आशा जोशी, सहखाजिनदार : वृषाली राजे, प्रमुख कार्यवाह : नरेंद्र बेडेकर, सहकार्यवाह : पद्मा हुशिंग, प्रणाली राजे व यतीन ठाकूर, अंतर्गत हिशेब तपासनीस : मच्छींद्र पाचकर. याव्यतिरिक्त कार्यकारी मंडळ सदस्यांच्या नेतृत्वाखाली विविध समित्या स्थापन केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे-
माहिती व तंत्रज्ञान समिती- अंबरीश ओक, प्रतीक जाधव, जयश्री पाठक, आदित्य संभूस
प्रसिद्धी समिती- श्रुतिका मोरेकर, दीपक सावंत
निधी संकलन समिती- केदार बापट
कार्यक्रम समिती- महेश सावंत-पटेल, प्रदीप भावे, प्रकाश बोर्डे
कार्यालयीन कामकाज समिती- शीतल पाटील, सल्लागार सदस्य- वंदना परांजपे, मध्यवर्ती शाखा समन्वयक- संदीप विचारे, निशिकांत महांकाळ.