उल्हासनगरात जीवावर आले बोटावर निभावले; भर रस्त्यात तलवारीने वार, उंगलीचे बोट तुटले
By सदानंद नाईक | Published: February 1, 2023 06:37 PM2023-02-01T18:37:24+5:302023-02-01T18:37:38+5:30
कॅम्प नं-१ येथील भोलानाथ टॉवर्स जवळ जुन्या रागातून मंगळवारी रात्री १ वाजता सोम पवार याने यश शर्मा यांच्यावर तलवारीने वार केला.
उल्हासनगर - कॅम्प नं-१ येथील भोलानाथ टॉवर्स जवळ जुन्या रागातून मंगळवारी रात्री १ वाजता सोम पवार याने यश शर्मा यांच्यावर तलवारीने वार केला. मात्र शर्मा याचा मित्र रोहित पुरणसिंग याने धावत जाऊन तलवारीचा वार हातावर झेलल्याने, त्याच्या हाताची उंगली बोट कापले गेले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर रेल्वे स्टेशन बाहेर भर दिवसा दोघांनी जुन्या वादातून चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला. या चाकू हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊनही जखमी तरुण तक्रार करण्यासाठी आला नाही, म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. तसेच हल्लेखोर तरुणाला विठ्ठलवाडी पोलिसांनी कारवाईचा इशारा देऊन सोडून दिले. याप्रकारने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
हा प्रकार नवा असताना कॅम्प नं-१ येथील महापालिका शाळा क्रं-२४ भोलानाथ टॉवर्स ठिकाणी जुन्या पैशाच्या वादातून मंगळवारी रात्री १ वाजता सोम पवार याने यश शर्मा यांच्यावर तलवारीने वार केला. यावेळी शर्मा याचा मित्र पुरणसिंग धावून येऊन तलवारीचा वार हातावर झेलला. या तलवार हल्ल्यात पुरणसिंग यांच्या हाताची उंगलीचे बोट कापले गेले. जिवावर आले पण बोटावर निभावल्याचे बोलले जाते. यावेळी डोक्यावर तलवारीचा वार लागल्याने, डोक्याला २४ टाक्के पडले. यापूर्वी सोम पवार व यश शर्मा यांच्यात भांडण झाले होते.
याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुरणसिंग याचे उंगलीचे बोट शस्त्रक्रिया करून तात्पुरते जोडण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.