हनुमान चालीसाचा विरोध केला म्हणून मुख्यमंत्रीपद व चिन्ह गेले; रवी राणांची बोचरी टीका

By नितीन पंडित | Published: March 20, 2023 08:09 PM2023-03-20T20:09:50+5:302023-03-20T20:10:22+5:30

भिवंडीत बागेश्वर धाम सरकार यांचे मंदिर व आश्रमाचे उदघाटन सोमवारी पार पडले, यावेळी आमदार राणांसह खासदार मनोज तिवारी उपस्थित होते.

he opposed Hanuman Chalisa, he lost chief minister's post, MLA Ravi Rana criticizes Mahavikas Aghadi along with Uddhav Thackeray | हनुमान चालीसाचा विरोध केला म्हणून मुख्यमंत्रीपद व चिन्ह गेले; रवी राणांची बोचरी टीका

हनुमान चालीसाचा विरोध केला म्हणून मुख्यमंत्रीपद व चिन्ह गेले; रवी राणांची बोचरी टीका

googlenewsNext

भिवंडी:- महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने हनुमान चाळीसाचा विरोध केला त्यामुळे यांचे सरकार गेले, मुख्यमंत्री पद व चिन्हही गेले अशी बोचरी टीका आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर केली आहे. भिवंडीतील दिवे अंजुर येथील इंडियन कॉर्पोरेशन माईलस्टोन येथे बागेश्वर धाम सरकार यांचे मंदिर व आश्रमाचे उदघाटन सोमवारी दिव्य बालाजी सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हस्ते पार पाडला,या कार्यक्रमाप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधतांना आमदार राणा यांनी ठाकरेंवर टिका केली.त्याचबरोबर आता आम्ही अमरावती येथे १११ फुटाची हनुमान मूर्ती मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री याच्या उपस्थित बसवणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या डोक्यातच कीड आहे अशी टीका देखील आमदार राणा यांनी यावेळी केली. 

या कार्यक्रमाप्रसंगी खासदार मनोज तिवारी देखील उपस्थित होते.या आश्रमासाठी रुद्र प्रताप त्रिपाठी यांनी जागा उपलब्ध करून दिल्याने सनातन धर्मासाठी हे मोठ स्थान बनेल असून महाराष्ट्र ही आधीपासूनच संतांची भूमी आहे आज एका मंदिरचे भूमिपूजन झाले ही आनंदाची गोष्ट आहे.जी लोक विरोध करत आहेत ते अनपड व बेअकली आहेत. कधी कधी मला वाटते ज्यांना भगवान राम या शब्दापासून चीड आहे तीच लोक विरोध करतात आणि सनातन धर्माला किड बोलणारेच किडा असतात अशाप्रकारे  सनातन धर्मावर प्रश्न उचलणारे संपून जातात अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार मनोज तिवारी यांनी या कार्यक्रमाप्रसंगी दिली आहे.

Web Title: he opposed Hanuman Chalisa, he lost chief minister's post, MLA Ravi Rana criticizes Mahavikas Aghadi along with Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.