लाखमोलाची नोकरी सोडून त्याने दिली ‘यूपीएससी’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 12:29 AM2020-08-13T00:29:20+5:302020-08-13T00:30:05+5:30

करुण गरड ६५६ क्रमांकासह यशस्वी; देशसेवा करण्याची इच्छा

He quit his job worth lakhs and gave UPSC got 656th rank | लाखमोलाची नोकरी सोडून त्याने दिली ‘यूपीएससी’

लाखमोलाची नोकरी सोडून त्याने दिली ‘यूपीएससी’

googlenewsNext

ठाणे : आपल्या देशाची, आपल्या राज्याची समाजसेवा करण्याचा निश्चय करीत ठाणेकर करुण गरड याने आपली इंजिनीअरिंग क्षेत्रातील लाखमोलाची नोकरी सोडून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. या परीक्षेत तो यशस्वी झाला असून त्याला देशभरातून ६५६ क्रमांक मिळाला आहे.

ठाण्यातील शिवाईनगर येथे सामान्य घरात आणि आई-वडील, भाऊ आणि बहीण अशा पाच जणांच्या कुटुंबात मोठा झालेला करुण याचे शालेय शिक्षण थिराणी विद्यामंदिर, तर महाविद्यालयीन शिक्षण वझे-केळकर महाविद्यालयातून पूर्ण झाले आहे. त्याने बीई आणि पुढे आयआयटी मद्रास येथून एमटेक पदवी मिळविलेली आहे. त्यानंतर तो एका खाजगी कंपनीत इंजिनीअर म्हणून नोकरी करीत होता. मात्र सामाजिक कार्याची आवड असल्याने त्याचे मन नोकरीत रमत नव्हते. शेवटी त्याने चांगली नोकरी सोडून २०१६ मध्ये एमपीएससी परीक्षा दिली. त्यात तो उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्याने यूपीएससीची परीक्षा दिली. त्यात तो उत्तीर्ण झाला; मात्र अपेक्षित गुणांकन मिळत नसल्याने त्याने पुन्हा परीक्षा दिली.

दरम्यान, आर्थिक परिस्थिती काहीशी बिघडल्याने त्याने आरबीआयसाठीची परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण झाल्यावर तेथे नोकरी सुरू केली. मात्र, देशसेवा करण्याचा त्याचा निश्चय ठाम आहे.

पुन्हा परीक्षा देण्याचा विचार
करुणचे वडील महसूल विभागातून निवृत्त झाले आहेत. तर, आई गृहिणी आहे. करुण याची पत्नीही गृहिणी असून तीही आपल्या पतीचा आदर्श ठेवत यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करीत आहे. तर, करुणही अजून वरचा क्रमांक मिळविण्यासाठी पुन्हा एक प्रयत्न करण्याच्या विचारात आहे.

Web Title: He quit his job worth lakhs and gave UPSC got 656th rank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.