शिवाजी रुग्णालयात होणार म्युकरमायकोसिसवरील उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:40 AM2021-05-14T04:40:03+5:302021-05-14T04:40:03+5:30

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या रोगावर वेळीच उपचार ...

He will be treated at Shivaji Hospital for myocardial infarction | शिवाजी रुग्णालयात होणार म्युकरमायकोसिसवरील उपचार

शिवाजी रुग्णालयात होणार म्युकरमायकोसिसवरील उपचार

Next

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या रोगावर वेळीच उपचार करण्याची गरज असल्याने त्यासाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अद्ययावत ऑपरेशन थिएटर सुरू करण्याचा निर्णय ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी घेतला.

ज्या कोरोना रुग्णांची रोगप्रतिकारक्षमता कमी आहे किंवा ज्या रुग्णांना मधुमेहाचा त्रास आहे, अशांना म्युकरमायकोसिस हा आजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या रुग्णांना डोळे आणि कानाला बुरशी आल्याने त्रास होतो. वेळीच उपचार मिळाले नाहीत तर डोळ्यांवाटे हा संसर्ग मेंदूमध्ये जाऊन रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते. गेल्या काही दिवसांत मुंबई, ठाणे व एमएमआर क्षेत्रात या आजाराचे रुग्ण वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे या रुग्णांवर वेळीच उपचार करून त्यांना कसा दिलासा देता येईल, याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

यावेळी ठाण्यातील नामवंत ईएनटी सर्जन डॉ. आशिष भूमकर आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी पालिकेला लागेल ते सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. त्यांच्याच नेतृत्वाखाली एक विशेष टीम कळवा रुग्णालयात तैनात करण्याचा निर्णयही घेण्यात आला. याशिवाय या रुग्णांना लागणारी औषधे, वैद्यकीय साधने आणि पुढे लागणारी ओपीडीची सुविधा पुरवण्याचेदेखील निश्चित करण्याचे करण्यात आले.

म्युकरमायकोसिस या आजारासाठी लागणारी इंजेक्शन्स महाग असल्याने त्यांचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच त्यांचा पुरेसा साठा करण्याचे निर्देश शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना दिले. ज्या रुग्णांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांना हा आजार लवकर होत असल्याचे निदर्शनास आल्याने तसेच ज्या रुग्णांना मधुमेहासह कोरोनाही झाला होता, अशा रुग्णांची यादी तयार करून त्यांच्याशी संपर्क करून म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसत नाहीत ना, याची तपासणी करण्याबाबत विचार करावा, अशी सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केली. बैठकीला ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, छत्रपती शिवाजी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भीमराव जाधव आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Web Title: He will be treated at Shivaji Hospital for myocardial infarction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.