... त्यांनी रुग्णांचं दु:ख जाणलं, 'आयुषमान भारत'साठी सरकारनं निवडलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 04:24 PM2018-11-29T16:24:58+5:302018-11-29T16:35:08+5:30

महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक असलेल्या नागरिकांवर तब्बल 971 आजारांवर दीड लाख रुपयांपर्यंतच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात.

... He worked hard for patients, the government choose for Ayushmann Bharat | ... त्यांनी रुग्णांचं दु:ख जाणलं, 'आयुषमान भारत'साठी सरकारनं निवडलं 

... त्यांनी रुग्णांचं दु:ख जाणलं, 'आयुषमान भारत'साठी सरकारनं निवडलं 

Next

मुंबई - मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची मूळ संपल्पना मांडणाऱ्या अन् शिवसेना वैद्यकीय सहायता कक्षच्या माध्यमातून गोर-गरिब रुग्णांसाठी झटणाऱ्या मंगशे चिवटे यांची राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या नियामक परिषद तथा शिस्तपालन व अंगिकरण समितीत विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती केली आहे. उपचारासाठी सरकारची मदत मिळेल या आशेने मुंबईत येणाऱ्या पीडित रुग्णांना मदत मिळवून देण्याचं अन् त्यांच दु:ख हलक करण्याचं काम मंगेश यांनी केलं. त्यांच्या या कामाची दखल घेऊनच सरकारने आयुषमान भारतसाठी त्यांना निवडलं आहे.  

राज्यातील गोरगरीब अन् पीडित रुग्णांच्या उपचारासाठी महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी महात्मा फुले जनआरोग्य योजना तथा प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या(आयुषमान भारत) नियामक परिषद तथा शिस्तपालन व अंगिकरण समितीवर विशेष निमंत्रित सदस्य पदी मंगेश चिवटे यांची नियुक्ती करण्यात आली. महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशीच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून या निवडीसंदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला आहे. या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी  मंगेश चिवटे यांना विधानभवन येथे शुभेच्छा दिल्या.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक असलेल्या नागरिकांवर तब्बल 971 आजारांवर दीड लाख रुपयांपर्यंतच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या सनियंत्रण, नियामक परिषदेचे अध्यक्ष स्वतः राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस असून शिस्तपालन तथा अंगिकरण समितीचे अध्यक्ष डॉ सुधाकर शिंदे ( IRS ) आहेत. मुंबईतील वरळी भागातील जीवनदायी भवन इमारत मुख्यालयातून महात्मा फुले जनआरोग्य योजना तथा प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (आयुष्यमान भारत) चे दैनंदिन कामकाज पार पडते.  

पत्रकारितेसाठी गावाकडून मुंबईत आलेला एक तरुण आमदार बच्चू कडूंच्या अंध अपंगांच्या कार्याने भारावला अन् आरोग्य सेवतील कामाने प्रेरीत झाला. त्यानंतर, मुंबईच्या पत्रकारितेत नावलौकिक झालेलं असतानाही पत्रकारितेला बाजूला सारत रुग्णांच्या वेदना जाणून घेण्याचं अन् त्यांचं दु:ख दूर करण्याचं काम या तरुणानं हाती घेतलं. त्यातूनच, मुख्यमंत्री सहायता निधीची संकल्पना उदयास आली अन् 17 मार्च  2015 मध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची सुरूवात झाली. त्यानंतर शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून त्यांनी शिवसेना वैद्यकीय कक्षाची स्थापना केली. या कक्षांच्या माध्यमातून पीडित अन् गरीब रुग्णांना आधारवड मिळाला. सरकारी योजनांची माहिती अन् लाभ मिळवून देण्यात या वैद्यकीय सहायता कक्षाने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली, ज्या कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आहेत.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून ठाणे जिल्हा पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आजपर्यंत एकूण 13 महाआरोग्य शिबीरात 1 लाख 10 हजार पेक्षा अधिक नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीतून निदान झालेल्या जवळपास चार हजारपेक्षा अधिक रुग्णांची मोतीबिंदू, एन्जीओप्लास्टी, बायपाससारख्या शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत करण्यात आल्या. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आजवर सरकारची 15 कोटी रूपयांहून अधिक मदत गरजूं रूग्णांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. मंगेश चिवटे यांच्या या निवडीने एक संवेदनशील अधिकारी आयुषमान योजनेला मिळाला असून गरजू रुग्णांसाठी निस्वार्थपणे धडपडणारा कार्यकर्ता शासनाचा सदस्य बनला आहे.
 

Web Title: ... He worked hard for patients, the government choose for Ayushmann Bharat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.