ओली चादर गुंडाळून त्याने विझविली सिलिंडरची आग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 11:38 PM2021-11-08T23:38:59+5:302021-11-08T23:43:30+5:30
घरगुती भारत गॅस सिलिंडरच्या नोझेलमधून गॅसगळती झाल्याने आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी चरईत घडली. मात्र, ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी महेंद्र हाटे यांनी प्रसंगावधान दाखवून जिवाची पर्वा न करता सिलिंडरवर ओली चादर गुंडाळून ती विझविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घरगुती भारत गॅस सिलिंडरच्या नोझेलमधून गॅसगळती झाल्याने आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी चरईत घडली. मात्र, ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी महेंद्र हाटे यांनी प्रसंगावधान दाखवून जिवाची पर्वा न करता सिलिंडरवर ओली चादर गुंडाळून ती विझविली. त्यांच्या या धाडसाचे शहरात कौतुक होत आहे.
सोमवारी सकाळी 6.40 वाजेच्या सुमारास चरईतील न्यू कादंबरी बिल्डिंगमधील तिसर्या मजल्यावरील 304 क्र मांकाच्या खोलीत घरगुती गॅस सिलिंडरच्या नॉझेलमधून गॅसगळती होऊन आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाने धाव घेतली. घटनास्थळी अिग्नशमन दलाच्या जवानांना पोहोचण्यासाठी विलंब होत असल्याने त्या कक्षाचे कर्मचारी हाटे यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतल्याने प्रसंगावधान दाखवून जिवाची पर्वा न करता आग लागलेल्या सिलिंडरवर ओली केलेली चादर गुंडाळून ती विझविली.
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रशिक्षण घेतले नाही तरी अशाप्रसंगी काय करावे किंवा किमान काय करू नये याबाबत सजगता दाखिवली तर मोठ्या प्रमाणात जीवित आण िवित्तहानी रोखण्यास आपल्याला यश येऊ शकते, हे दाखवून दिले. त्यामुळे हाटे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून, अिग्नशमन दलाचे जवान आल्यावर तो सिलिंडर त्यांच्या हवाली केला. यामध्ये कोणतीही वित्त किंवा जीवितहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.