भाईंदरच्या जय अंबे नगर मधील आरोग्य केंद्र ६ महिन्यां पासुन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 09:43 PM2020-01-10T21:43:27+5:302020-01-10T21:43:46+5:30

महापालिकेच्या आरोग्य केंद्रा मुळे रहिवाशांना नाममात्र शूल्कात वैद्यकिय सुविधा मिळत असल्याने मोठा दिलासा मिळतो.

Health center in Jai Ambe Nagar of Bhayandar closed for 6 months | भाईंदरच्या जय अंबे नगर मधील आरोग्य केंद्र ६ महिन्यां पासुन बंद

भाईंदरच्या जय अंबे नगर मधील आरोग्य केंद्र ६ महिन्यां पासुन बंद

googlenewsNext

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेचे भाईंदर पश्चिमेच्या जय अंबे नगर झोपडपट्टीतील आरोग्य केंद्र गेल्या ६ महिन्यां पासुन दुरुस्तीसाठी बंद असल्याने नागरिक वैद्यकिय सुविधे पासुन वंचीत आहेत.

जय अंबे नगर मध्ये झोपडपट्टी आणि गलिच्छ वस्ती असुन या ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य केंद्रा मुळे रहिवाशांना नाममात्र शूल्कात वैद्यकिय सुविधा मिळत असल्याने मोठा दिलासा मिळतो. परंतु दुरुस्तीसाठी म्हणुन सदरचे आरोग्य केंद्र गेल्या ६ महिन्यां पासुन बंद आहे. आत मध्ये नविन साहित्य आदी आणलेले आहे. रंगरंगोटी झालेली आहे. पण दुरुस्तीचे काम बाकी असल्याने आरोग्य केंद्र सुरु केले गेले नसल्याचे कारण पुढे केले जात असले तरी सुत्रांनी मात्र पालिके कडे पुरेसे वैद्यकिय अधिकारी नसल्याने सदरचे आरोग्य केंद्र सुरु केले जात नसल्याचे सांगण्यात आले.

आरोग्य केंद्रात एका बाजुस सदद्या लहान बालकांसाठी लसीकरण सुरु केले गेले आहे. परिचारीका असतात. परंतु रुग्णांवर उपचार मात्र अद्याप सुरु केले गेले नाहित. रहिवाशी विचारणा करायला गेले की, २६ जानेवारी सुरु केले जाईल असे उत्तर सुध्दा ऐकायला मिळते. तर कधी विद्युत काम बाकी असल्याचे सांगीतले जाते असे स्थानिक रहिवासी म्हणाले. आरोग्य केंद्र बंद असल्याने नाईलाजाने खाजगी डॅक्टरां कडे जावे लागते. ते खुपच जास्त पैसे घेत असल्याने आम्हाला परवडत नाही असे रहिवासी म्हणाले.

डॉ. प्रमोद पडवळ ( मुख्य वैद्यकिय अधिकारी ) - आपण स्वत: या आरोग्य केंद्राची पाहणी केली आहे. स्वच्छता गृहाचे काम अजुन बाकी असुन ते पुर्ण झाले की केंद्र सुरु केले जाईल.

गणेश बामणे ( स्थानिक रहिवाशी ) - आरोग्य केंद्राची रहिवाशांना खुपच गरज आहे. कारण येथे रुग्णांची संख्या नेहमीच जास्त असते. गरीब गरजुंना खाजगी डॉक्टर परवडत नाही. ६ महिने झाले तरी आरोग्य केंद्र का सुरु झाले नाही याचे नेमके कारण प्रशासन व नगरसेवक देखील सांगत नाहित. यातुन त्यांची वैद्यकिय सेवे बद्दलची अनास्था दिसुन येते.

Web Title: Health center in Jai Ambe Nagar of Bhayandar closed for 6 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.