कसारा आरोग्यकेंद्र केवळ शोभेची वस्तू, रुग्णांची होत आहे हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 01:42 AM2019-10-03T01:42:16+5:302019-10-03T01:44:02+5:30
कसारा घाटातील अपघातांची संख्या तसेच बाह्यरुग्णांना अद्ययावत व चांगले उपचार मिळावेत, अतिदुर्गम भागातील गोरगरिबांना खासगी दवाखान्यात भुर्दंड पडू नये, यासाठी कसारा येथे पाच कोटी खर्च करून दुमजली इमारत असलेले रु ग्णालय बांधण्यात आले.
कसारा : कसारा घाटातील अपघातांची संख्या तसेच बाह्यरुग्णांना अद्ययावत व चांगले उपचार मिळावेत, अतिदुर्गम भागातील गोरगरिबांना खासगी दवाखान्यात भुर्दंड पडू नये, यासाठी कसारा येथे पाच कोटी खर्च करून दुमजली इमारत असलेले रु ग्णालय बांधण्यात आले. एवढेच नव्हे तर रुग्णांना २४ तास सेवा मिळावी, यासाठी निवासी डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचाऱ्यांसाठी दोन स्वतंत्र इमारती बांधण्यात आल्या. परंतु, या दोन्ही वास्तू आजघडीला शोभेच्या वास्तू झाल्या आहेत.
काही महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या कसारा प्राथमिक आरोग्यकेंद्रात कार्यरत डॉक्टर व कर्मचारी रु ग्णांची हेळसांड करत आहेत. तीन दिवसांपूर्वी मुंबई-नाशिक महामार्गावर मोठा अपघात झाला होता. त्यात वीसवर्षीय पूर्वा शेलार ही तरुणी गंभीर जखमी झाली होती. या तरुणीला कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यावर तिला डॉक्टर व नर्स यांनी तब्बल १५ ते २० मिनिटे तसेच ठेवले. तिला १५ ते २० मिनिटे कुठलेही उपचार मिळाले नाही. या जखमी तरुणीला गाडीतून रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी स्ट्रेचरही देण्यात आले नाही. आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांनी त्या तरु णीला तपासण्याची विनंती डॉक्टरना केल्यावर डॉक्टर देवेंद्र वाळुंज यांनी जखमी तरु णीला न तपासताच खर्डी ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. जखमी पूर्वास खर्डी येथे घेऊन गेल्यावर तिचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी प्रसिद्धिमाध्यमे व सोशल मीडियातून आवाज उठताच डॉक्टर वाळुंज यांनी जमावाविरोधात वक्तव्य करत डिंगोरा पिटला. या वक्तव्याची तिखट प्रतिक्रि या उमटल्यानंतर मंगळवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंगे यांनी कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. रुग्णालय प्रशासन व मदतीला आलेल्या ग्रामस्थ यांची बैठक घेतली. या वेळी प्रत्यक्षदर्शींनी डॉक्टर वाळुंज व कर्मचाऱ्यांनी कशा प्रकारे हलगर्जीपणा केला, हे पटवून दिले. परंतु, डॉक्टर रेंगे यांनी दोषी कर्मचाºयांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.
कसारा प्राथमिक आरोग्यकेंद्रात अपघातातील रुग्णांवर तसेच गंभीर आजारांवर उपचार होणार नाहीत. येथे फक्त थंडी, ताप यावरच उपचार होऊ शकतात, असा अजब सल्ला उपस्थितांना दिला. तर, कसारा प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाळुंज यांनी या रुग्णालयात रोज १०० हून अधिक बाह्यरुग्ण असतात. इतक्या रुग्णांची तपासणी माझ्याकडून शक्य नाही. शिवाय, अपघातांतील गंभीर जखमींवर उपचार करण्यासाठी ट्रॉमा केअरसारख्या सुविधा असलेल्या रुग्णालयात जावे. प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचार होणार नाही, अशी सक्त ताकीदच दिली.
गोरगरीब नागरिक व अपघातग्रस्तांना वेळीच प्रथमोपचार मिळावे, यासाठी कोट्यवधी खर्च करून बांधण्यात आलेल्या रुग्णालयात जर अत्यावश्यक सेवा मिळणार नसतील, तर रु ग्णालयास टाळे ठोकू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तर, कामात हलगर्जीपणा करणाºया डॉक्टरांवर तसेच पाठीशी घालणाºया अधिकाºयांवर कारवाई करून कसारा प्राथमिक आरोग्यकेंद्रात सुविधा देण्याची मागणी करण्यात आली.
माझ्याकडे बाह्यरुग्णांची तपासणी सुरू होती. बाहेर अपघाताचे रु ग्ण आहेत, हे मला कोणी सांगितले नाही. मला जेव्हा समजले, तेव्हा मी जखमीला बघितले व पुढील सूचना केली.
- डॉ, देवेंद्र वाळुंज, वैद्यकीय अधिकारी, कसारा
जखमींना उचलण्यास स्ट्रेचरही नव्हते. अपघात झाल्यावर देवदूत बनून आलेल्या नागरिकांनी आम्हाला जखमी अवस्थेत रुग्णालयात आणले, तेव्हा आमच्यापैकी दोन सहकारी तरुणी गंभीर होत्या. त्यांना ओेपीडीत घेऊन जाण्यासाठी स्ट्रेचरही नव्हते. पूर्वा शेलार हिच्यावर वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.
- स्वरूप वाघ, अपघातग्रस्त
जखमी तरु ण