उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात पोलिसांच्या आरोग्याची तपासणी
By सदानंद नाईक | Published: February 26, 2023 05:24 PM2023-02-26T17:24:46+5:302023-02-26T17:25:42+5:30
सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड, मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा शक्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली.
उल्हासनगर : नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तैनात असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी वर्गाची आरोग्य तपासणी मध्यवर्ती रुग्णालयाच्या वतीने करण्यात आली. सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड, मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा शक्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांच्या संकल्पनेतून शहरातील एकून चार पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवारी केले होते. यावेळी डॉ. वसंतराव मोरे, डॉ सुहास मोनाळकर, डॉ मृणाली रहुड, डॉ साळवे, डॉ तृप्ती रोकडे, डॉ वर्षा दवानी, डॉ शीतल थोरात यांच्यासह विविध विभागातील तज्ञ डॉक्टर तपासणी शिबिरात सहभागी झाले होते. रुग्णालयाचे सामाजिक कार्यकर्ते नितीन गावंडे यांनी शिबिराची माहिती यावेळीं उपस्थितीना माहिती दिली. शिबिरात ३०० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी व कर्मचारिन्यांनी सहभाग नोंदवून तपासणी करून घेतली. आरोग्य तपासणीत अनेक पोलीस अधिकारी व पोलिसांना उच्चरक्तदाब, मधुमेह, आदी रोगाचे निदान निघाले असून मध्यवर्ती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करणार आहेत. अशी माहिती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली. तसेच मध्यवर्ती रुग्णलाय शहर परिसरात प्रसिद्ध असून रुग्णालयात हजारो नागरिक दररोज उपचार घेतात.